केवळ आसाममधील नव्हे, तर भारतातील बांगलादेशी घुसखोर मुसलमानांनाही देशाबाहेर काढा ! : राष्ट्रीय हिंदू आंदोलनातील हिंदुत्वनिष्ठांची मागणी
कोपरगाव : केवळ आसाममधील बांगलादेशी घुसखोर नव्हे, तर संपूर्ण देशातील बांगलादेशी घुसखोर मुसलमानांनाही देशाबाहेर काढा, अशी मागणी येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनात समस्त हिंदुत्वनिष्ठांनी केली.
सरकारने बांगलादेश, म्यानमार आणि पाकिस्तान येथून आलेल्या घुसखोरांची संख्या जाणण्यासाठी राष्ट्रीय नागरिक नोंदणी पुस्तकांची सूची सिद्ध करण्याचे आदेश तात्काळ द्यावेत ! – श्रीमती वैशाली कातकडे, हिंदु जनजागृती समिती
आसाममध्ये बांगलादेशी घुसखोर कोण आणि मूळ आसामी नागरिक कोण याची माहिती देणारी नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीजनची प्राथमिक सूची प्रसिद्ध झाली. यामधून लिस्त ऑफ लोक सध्या आसाममध्ये अवैधरित्या म्हणजे घुसखोरी करून रहात असल्याचे निष्पन्न झाले. घुसखोरांच्या मोठ्या संख्येमुळे आणि अल्पसंख्याकांच्या नावाखाली त्यांना मिळत असलेल्या सुविधांमुळे आसाममधील हिंदू सोयीसुविधांपासून वंचित रहात आहे. केंद्र सरकारने आता बांगलादेश, म्यानमार आणि पाकिस्तान येथून आलेल्या घुसखोरांची संख्या नेमकी किती आहे, ते जाणून घेण्यासाठी राष्ट्रीय नागरिक नोंदणी पुस्तकांची सूची सिद्ध करण्याचे आदेश तात्काळ द्यावेत !
आंदोलनातील अन्य मागण्या
१. शिर्डी येथील साईबाबा संस्थान येथील मंदिरासाठी वापरण्यात येणार्या नमुना तुपात झुरळ सापडणे, कुंभपर्वासाठी दिलेल्या निधीतून वस्तू खरेदीत ६६ लक्ष रुपयांचा घोटाळा होणे या गोष्टींकडे मंदिर विश्वस्तांनी दुर्लक्ष करणे म्हणजे देवनिधीमध्ये होणारा भ्रष्टाचार रोखण्यात पराकोटीची उदासीनता असल्याचे दर्शवते. या प्रकरणातील संबंधित विश्वस्त अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई करावी.
२. ‘लवरात्री’, ‘जिला गोरखपूर’ आणि ‘मुल्क’ या हिंदुविरोधी चित्रपटांवर बंदी घालावी, गणेशोत्सवात प्रदूषण मुक्तीच्या नावाखाली प्रतिबंधित कागदी लगद्यापासून बनवलेल्या गणेशमूर्तीवर शासनाने बंदी घालावी.
तहसील कार्यालयात मागण्यांचे निवेदन !
आंदोलनानंतर सर्व मागण्यांचे निवेदन कोपरगाव तहसील कार्यालयात देण्यात आले. या वेळी हिंदुत्वनिष्ठ कृष्णा जाधव, हिंदु जनजागृती समितीच्या श्रीमती वैशाली कातकडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गणेश शिंदे, तसेच शिवाजी उगले, दिलीप सारंगधर आणि मोठ्या प्रमाणात हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.