यवतमाळ
रक्षाबंधनाच्या निमित्ताने सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने जिल्ह्यात भाजपचे केंद्रीय मंत्री माननीय हंसराज अहिर, ठाणेदार, तहसीलदार, संपादक, दैनिक जिल्हा प्रतिनिधी, पत्रकार, हितचिंतक, हिंदुत्वनिष्ठ अशा २६ जणांना राख्या बांधण्यात आल्या.
हिंदुत्वनिष्ठांच्या सनातनला पाठिंबा दर्शवणार्या प्रतिक्रिया
१. दैनिक लोकदूतचे संपादक श्री. संजय अकोलकर सनातन संस्थेच्या सौ. सिंधू देऊळकर यांना म्हणाले, ताई, तुम्हाला काहीही अडचण असल्यास आम्हाला सांगा, आम्ही सदैव आपल्या पाठीशी आहोत.
२. दैनिक सामनाचे जिल्हा प्रतिनिधी श्री. गणेश बस म्हणाले, सनातन संस्थेवर बंदी येऊ शकत नाही; कारण सनातन संस्थेचे सर्व साधक निर्दोष सुटतील.
३. ऑगस्ट महिना आल्यावर सनातनविरोधी संघटनांना जाग येते, अशी प्रतिक्रिया दैनिक तरुण भारतचे जिल्हा प्रतिनिधी श्री. अनिरुद्ध पांडे यांनी व्यक्त केली.
नाशिक
खासदार श्री. हेमंत गोडसे, सिन्नर येथील आमदार श्री. वाजे, पाथर्डी फाटा येथील गणेश मंडळाचे अध्यक्ष श्री. शिवाजी पवार, तसेच कोपरगाव येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. चेतन खुमानी, श्री. रमेश वाघ, श्री. दिलीप दारूलकर यांना तसेच नाशिक येथील लोकमत आणि महाराष्ट्र टाईम्स चे संपादक अन् लोकसत्ता आणि देशदूत या वृत्तपत्रांचे पत्रकार यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राखी बांधण्यात आली. रक्षाबंधनाचा उपक्रम चांगला असल्याचा अभिप्राय या वेळी देण्यात आला.