पंढरपूर (जिल्हा सोलापूर) : येथे २ मार्च या दिवशी घेण्यात आलेल्या हिंदु धर्मजागृती सभेनंतरच्या आढावा बैठकीला हिंदुत्ववाद्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून स्वत: धर्मशिक्षण घेऊन हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी हिंदु धर्मबांधवांना संघटित करण्याचा निर्धार या वेळी करण्यात आला.
४ मार्च या दिवशी सायंकाळी ६ वाजता ही आढावा बैठक स्वा. सावरकर मुक्तदार वाचनालय, सावरकर पथ येथे घेण्यात आली होती. बैठकीत हिंदु जनजागृती समितीच्या सौ. अलका व्हनमारे आणि श्री. विनोद रसाळ यांनी मार्गदर्शन केले. बैठकीत प्रत्येक रविवारी सायंकाळी ६ वाजता सावरकर वाचनालय येथे धर्मशिक्षण वर्ग घेण्यासह प्रत्येक मासाच्या पहिल्या आठवड्यात राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्याचे निश्चित करण्यात आले. या वेळी गोरक्षक सर्वश्री आदिनाथ भोसले, स्वप्नील सुभेदार, अमोल पुजारी यांसह २७ हिंदु धर्मबांधव उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात