‘ऑगस्ट २०१८ पर्यंत कोणी सनातन संस्थेला मानसिक स्तरावर विरोध केला, तर सनातन संस्थेच्या वक्त्यांना विरोधकांविरुद्ध विशेष बोलता यायचे नाही; कारण ते केवळ आध्यात्मिक स्तरावर बोलणे जाणत. त्यामुळे त्यांना इतरांप्रमाणे मानसिक स्तरावर बोलणे कठीण जायचे. त्याच बरोबर त्यांच्या बोलण्याकडे सर्वच वाहिन्या दुर्लक्ष करायच्या आणि नियतकालिके त्यांचे म्हणणे छापायची नाहीत. ऑगस्ट २०१८ पासून परिस्थिती पालटण्यास आरंभ झाला आहे. आता सनातन संस्थेला हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा पाठिंबा आहे, तसेच संस्थेचे वक्ते मानसिक स्तरावरही बोलू शकतात. त्यामुळे आता वक्त्यांचे बोलणे काही वाहिन्या प्रसारित करतात आणि काही नियतकालिके त्यांचे म्हणणे छापतात.
आता पुढील ३ वर्षांनी परिस्थिती इतकी उलट होईल की, बहुतेक सर्वच वाहिन्या संस्थेच्या वक्त्यांचे बोलणे प्रसारित करतील आणि बहुतेक सर्वच नियतकालिके त्यांचे म्हणणे छापतील; पण विरोधकांच्या बोलण्याला महत्त्व देणार नाहीत. याला ‘कालमाहात्म्य’ म्हणतात.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात