Menu Close

दर्यापूर (अमरावती) येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलन

हिंदु जनजागृती समितीच्या समन्वयकांचे आवाहन ऐकल्यावर गर्दी करून जमलेल्या २०० जणांचा स्वाक्षर्‍यांद्वारे प्रतिसाद !

आवाहनाला लगेचच प्रतिसाद देणार्‍यांचे अभिनंदन !

अमरावती : हिंदु जनजागृती समितीचे अमरावती जिल्हा समन्वयक श्री. नीलेश टवलारे यांनी येथे झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात ‘हिंदुत्वनिष्ठ संघटनांवर बंदी घालणे म्हणजे एकप्रकारे हिंदु धर्मावरच बंदी घालण्यासारखे आहे. त्यामुळे या षड्यंत्राला प्रत्येकाने मोठ्या प्रमाणात विरोध करायला हवा’, असे म्हटले. हे वाक्य उच्चारताच आंदोलनाच्या समोर जवळपास २०० लोक गर्दी करून जमले. त्यांनी सर्व विषय समजून घेऊन मागण्यांवर स्वतःहून स्वाक्षरी केली. येथील दर्यापूर तालुक्यात ३० ऑगस्ट या दिवशी राष्ट्रीय हिंदू आंदोलन झाले. आंदोलनात धर्मप्रेमी श्री. संदीप राजगुरे यांनी सूत्रसंचालन केले.

श्री. नीलेश टवलारे पुढे म्हणाले, ‘‘हिंदुत्वनिष्ठांना अटक केल्याच्या सर्वच प्रकरणांत पोलिसांचे वागणे, हे संशयास्पद आणि हिंदुत्वनिष्ठांवर दबावतंत्र निर्माण करणारे आहे. त्यामुळे या प्रकरणातील पोलिसांचीच चौकशी करण्यात यावी आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच निर्दोष असलेल्या हिंदुत्वनिष्ठांना सोडण्यात यावे.’’

आंदोलनात करण्यात आलेल्या अन्य मागण्या

१. केवळ आसाममधील बांगलादेशी घुसखोर नव्हे, तर संपूर्ण देशभरातील बांगलादेशी घुसखोर मुसलमानांनाही देशाबाहेर काढा.

२. ‘इको फ्रेंडली’ मूर्तीच्या नावाखाली ‘राष्ट्रीय हरित लवादा’ने प्रदूषणकारी असल्याचे घोषित केलेल्या कागदी लगद्यापासून सिद्ध केलेल्या श्री गणेशमूर्तींना शासनाने प्रोत्साहन देऊ नये.

क्षणचित्रे

१. आंदोलनाचे आयोजन धर्मशिक्षणवर्गात येणार्‍या धर्मप्रेमींनी केले होते.

२. श्री. गणोरकर या दुकान मालकांनी आंदोलनासाठी वीज व्यवस्था विनामूल्य उपलब्ध करून दिली.

३. माजी नगरसेवक श्री. प्रदीप मलीये म्हणाले, ‘‘हे सर्व सनातनविरुद्ध रचलेले षड्यंत्र आहे.’’

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *