ख्रिस्त्यांकडून चालवण्यात येणार्या कॉन्व्हेंट शाळांमधून नेहमीच हिंदूंच्या प्रथा-परंपरा पायदळी तुडवण्याचे प्रकार समोर येत असतात. अशा घटना रोखण्यासाठी भाजपच्या केंद्र सरकारने आणि २० राज्यांतील सरकारांनी कठोर नियम बनवले पाहिजेत !
कर्णावती (गुजरात) : गांधीनगर येथील ‘मांऊट कारमेल’ या कॉन्व्हेंट शाळेतील शिक्षकांनी रक्षबंधनानिमित्त विद्यार्थ्यांच्या हातावर बांधण्यात आलेल्या राख्या बलपूर्वक कापून टाकण्यात आल्याची घटना समोर आली आहे. यानंतर गुजरात सरकारने या शाळेकडून याविषयी स्पष्टीकरण मागितले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि विश्व हिंदू परिषद यांच्या कार्यकर्त्यांनी शाळेच्या बाहेर निदर्शनेही केली. शिक्षणमंत्री भूपेंद्र सिंह यांनी सांगितले की, शाळेला याविषयी नोटीस बजावण्यात आली आहे. ही घटना अयोग्य आहे. धार्मिक भावना दुखावण्यात येणारे असे कृत्य आम्ही सहन करणार नाही. नोटीसीवर उत्तर आल्यावर पुढील कारवाई केली जाईल.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात