आता बुद्धीप्रामाण्यवादी आणि पुरो(अधो)गामी यांनी या संशोधनाचा अभ्यास न करता त्यावर टीका केल्यास आश्चर्य वाटणार नाही !
नवी देहली : श्रीमद्भगवद्गीतेचे पठण केल्याने मधुमेहासारखे आजार बरे होतात, असे संशोधन भारत, बांगलादेश आणि पाकिस्तान येथील संशोधकांनी केलेल्या संशोधनातून समोर आले आहे. संशोधकांच्या या पथकामध्ये भाग्यनगर येथील ‘उस्मानिया जनरल हॉस्पीटल’च्या डॉक्टरांचाही समावेश होता.
संशोधकांनी म्हटले आहे की,
१. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा संवाद आहे. गीतेमध्ये नकारात्मक अवस्थेला दर्शवण्यात आले आहे आणि त्या अवस्थेवर मात करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने सकारात्मक मार्गदर्शन केले आहे. अर्जुन हे मार्गदर्शन आचरणात आणतो.
२. मधुमेह हा जीवनशैलीमुळे होणारा आजार आहे. अन्न आणि व्यायाम यांच्या मूलभूत सवयींमध्ये झालेल्या पालटामुळे हा आजार होतो. गीतेमध्ये सांगितलेल्या मार्गदर्शनानुसार आचरण केल्यास त्यावर मात करता येते.
३. गीतेमधील ७०० श्लोक जीवनातील प्रत्येक पैलूवर प्रकाश टाकतात. ते व्यक्तीला नकारात्मकतेतून सकारात्मकतेकडे घेऊन जातात. हे श्लोक व्यक्तीच्या जीवनामध्ये पूर्णपणे पालट घडवू शकतात.
४. मधुमेह झालेल्या व्यक्तीला त्याच्या अनेक गोष्टींमध्ये पालट करावा लागतो. गीतेच्या अभ्यासाने संयम ठेवण्याची, जीवनशैली पालटण्याची आणि औषधोपचाराचे पालन करण्याची प्रेरणा मिळते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात
0 Comments