Menu Close

ठाणे जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने एक दिवसीय ‘हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळा’

गुरुकृपायोगानुसार साधना करून आदर्श हिंदु राष्ट्र संघटक व्हा ! – बळवंत पाठक, हिंदु जनजागृती समिती

कार्यशाळेत उपस्थित धर्माभिमानी

डोंबिवली : गुरुकृपायोग हा जलद गतीने आध्यात्मिक प्रगती करून देणारा योगमार्ग आहे. हिंदु राष्ट्र संघटक म्हणून कार्य करतांना साधना म्हणून कार्य करण्यासाठी आपण व्यष्टी आणि समष्टी साधना करणे आवश्यक आहे. व्यष्टी साधनेत अष्टांग साधना कृतीत आणली, तर आपले कार्य प्रभावी होऊन देवाला अपेक्षित असे हिंदू संघटन आपण करू शकतो. आदर्श हिंदु राष्ट्र संघटक बनण्यासाठी साधना करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे श्री. बळवंत पाठक यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने एव्हरेस्ट सभागृह, डोंबिवली पश्‍चिम येथे ३ सप्टेंबर या दिवशी हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते.

या वेळी हिंदुत्वनिष्ठांची आचारसंहिता कशी असावी ?, या संदर्भातील मार्गदर्शन समितीचे प्रवक्ते श्री. सतीश कोचरेकर यांनी केले. या वेळी त्यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे आपले वर्तन आदर्श असायला हवे, तरच आपण हिंदु राष्ट्र स्थापनेचे पाईक होऊ शकतो’, असे सांगितले. कार्यशाळेच्या शेवटी श्री. बळवंत पाटील यांनी आभार व्यक्त केले.

हिंदु जनजागृती समितीच्या वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून आपण हिंदूंचे संघटन प्रभावीपणे करू शकतो ! – सौ. वेदिका पालन

धर्मशिक्षण, धर्मजागृती सभा, राष्ट्रीय हिंदू आंदोलन या माध्यमातून आपण हिंदूंचे संघटन प्रभावीपणे करू शकतो. यासाठी आपण कृतीच्या स्तरावरही प्रयत्न करूया.

स्वभावदोष आणि अहं निर्मूलन केले, तरच ईश्‍वराचा आशीर्वाद मिळून कार्य निर्विघ्नपणे पार पडते ! – सौ. सुनिता पाटील, सनातन संस्था

स्वभावदोष आणि अहं हा ईश्‍वरप्राप्ती मधील मोठा अडथळा असतो. तो दूर केला की आपण सतत आनंदी राहू शकतो. धर्मकार्य करतांना स्वभावदोष आणि अहं निर्मूलन केले, तरच ईश्‍वराचा आशीर्वाद मिळून कार्य निर्विघ्नपणे पार पडते आणि त्याची फलनिष्पत्ती वाढते.

उपस्थित धर्मप्रेमींनी व्यक्त केलेले मनोगत

१. कार्यशाळेच्या माध्यमातून कार्याची योग्य दिशा मिळाली. वेगवेगळे उपक्रम समजले. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसंदर्भात मनात अनेक नकारात्मक विचार होते; पण आज त्याला पूर्णविराम मिळाला. पुढील कार्यासाठी सकारात्मक विचारांची प्रेरणा मिळाली. – श्री. श्रीकांत वाघचौरे, शहापूर

२. आज आपण जे शिक्षण घेतो, ते आपले पोट भरण्यासाठी घेतो; पण धर्माचे शिक्षण हिंदु जनजागृती समिती देते, त्यासाठी आम्ही भाग्यवान समजतो. समाजात चुकीचे कार्य घडत आहे. जेव्हा असे मोठ्या प्रमाणात होते, तेव्हा ते कार्य व्यवस्थित करण्यासाठी भगवान श्रीविष्णु पृथ्वीवर पुन्हा अवतार घेतात. तसाच अवतार म्हणजे हिंदु जनजागृती समिती आहे. – श्री. गणेश पवार, कल्याण

३. कार्यशाळेमुळे आत्मविश्‍वास वाढला. आज जे ज्ञान मिळाले, ते पुढील धर्मकार्यासाठी वापरीन- श्री. कर्ण चौधरी, डोंबिवली

४. हिंदु राष्ट्राविषयी कोणीही प्रश्‍न विचारले, तर या कार्यशाळेमुळे मी उत्तरे देऊ शकते, याचे समाधान मिळाले. अंधश्रद्धा निर्मूलन समिती याविषयी अनेक अपसमज पसरवत आहे. – कु. पद्मजा चौधरी, डोंबिवली

५. कार्यशाळेत येण्यासाठी माझी द्विधा मनस्थिती होती. तरीही येण्याचा प्रयत्न केला. इथे आलो नसतो तर पुष्कळ गोष्टींना मी मुकलो असतो. मी पूर्वी सेवा करत होतो; पण हिंदु जनजागृती समिती कसे कार्य करते, हे समजले. – श्री. संदीप शिर्के, डोंबिवली

६. आज माझे पाय कार्यालयाकडे न वळवता कार्यशाळेकडे वळवले यासाठी मी श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञ आहे.- श्री. अमोल खैरनार, डोंबिवली

७. धर्मकार्यात नेमका हातभार कसा लावायचा ते कळले. अहंमुळे स्वतःची किती हानी होते, ते शिकायला मिळाले. – कु. भावेश पानवळ, ठाणे,

८. राज्यघटनेच्या आधारावर आपल्याला हिंदु राष्ट्राची स्थापना करायची आहे, हे या कार्यशाळेच्या माध्यमातून शिकायला मिळाले. – श्री. ओंकार चांगण, ठाणे

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *