विकाराबाद (तेलंगण) : येथील बशिराबाद गावामध्ये १ सप्टेंबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने लहान हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. आयोजनात धर्मप्रेमी संतोष अष्टीकर यांनी मोलाचे साहाय्य केले. केवळ २ दिवस २ साधकांनी या सभेसाठी प्रचार केला होता आणि सभेला १२० हून अधिक युवक उपस्थित राहिले. सभेच्या आयोजनामध्ये सहभागी झालेल्या साधकांचे भोजन, सभेसाठी आवश्यक साहित्य यांचे दायित्व गावातील धर्मप्रेमी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे घेतले. सभेमध्ये हिंदु जनजागृती समितीचे राज्य समन्वयक श्री. चेतन गाडी यांनी त्यांच्या मार्गदर्शनात धर्मनिरपेक्षतेमुळे झालेल्या भारताच्या आणि हिंदु धर्माच्या अधोगतीची माहिती दिली. यावर उपाय म्हणून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची आवश्यकता याविषयीही लोकांना सांगितले. अंबा भवानी मंदिराचे शंकर पुरोहित यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
क्षणचित्रे
१. सभेनंतरच्या जिज्ञासूंच्या बैठकीमध्ये ६५ युवक उपस्थित होते आणि त्यांनी आणखी ५ धर्मसभा आयोजित करण्याची मागणी केली.
२. सभेनंतर अभिप्राय देतांना अनेक युवकांनी लिहून दिले की, आम्ही हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात सहभागी होऊ इच्छितो, तसेच आम्हाला धर्मशिक्षण मिळावे, अशी त्यांनी मागणी केली.
३. १६ वर्षांच्या १० मुलींनी ‘सभा ऐकून कसे वाटले?’, असे विचारल्यावर त्यांनी ‘हिंदु राष्ट्राची स्थापना झाली पाहिजे. आम्हाला हिंदु राष्ट्र हवे आहे’, असे म्हटले.