मुंबई : यापूर्वी काँग्रेसप्रणीत शासनाच्या काळातही जेव्हा जेव्हा सनातनवर बंदीचा प्रयत्न करण्यात आला, त्या वेळी शिवसेना सनातनच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे, तसेच या वेळीही आम्ही तुमच्या पाठीशी समर्थपणे उभे आहोत, असे शिवसेनेचे माहिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. सदा सरवणकर यांनी सांगितले. सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती यांसह अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्यावर खोटे आरोप करून बंदीची मागणी करण्यात येत आहे. या विरोधात १ सप्टेंबर या दिवशी श्री. सरवणकर यांना निवेदन देण्यात आले. या वेळी सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्याचे संघटक श्री. सुनील घनवट, तसेच मुंबई समन्वयक श्री. सागर चोपदार यांनी हिंदुत्वनिष्ठ संघटनांवरील बंदीच्या षड्यंत्राविषयीची सविस्तर माहिती दिली. या वेळी ज्येष्ठ शिवसैनिक श्री. श्याम चित्रे उपस्थित होते. या वेळी ‘आम्ही तुमच्या समवेत आहोत’, असे त्यांनी पुन्हा सांगितले.
आम्ही तुमच्या पाठीशी समर्थपणे उभे आहोत : आमदार सदा सरवणकर, शिवसेना
Tags : Anti HindusHindu Janajagruti SamitiHindu OrganisationsSanatan-Sansthaशिवसेनाहिंदूंच्या समस्या
शुभ कामनाएँ! भारत का तो कुछ नहीं हो सकता अब.