- हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्यांचा विरोध करण्यालाही अनुमती न देणारे आणि हिंदूंच्या संतांना नजरकैदेत ठेवणारे तेलंगणमधील तेलंगण राष्ट्र समितीचे सरकार हिंदुद्वेषीच होय !
- राज्यातील मुसलमानांची मते मिळवण्यासाठी सरकारने ही कृती केली आहे, हे या राज्यांतील हिंदूंनी लक्षात घ्यावे !
भाग्यनगर : हिंदुविरोधी विधाने करणार्यांच्या विरोधात तेलंगणच्या काकीनाडा श्री पीठम्चे प्रमुख स्वामी परिपूर्णानंद काढत असलेल्या प्रस्तावित ४० किमी लांब पदयात्रेच्या आधीच त्यांना तेलंगण सरकारने नजरकैदेत ठेवले. ही यात्रा बोडुप्पल ते यदादरी अशी चालणार होती. या यात्रेला पोलिसांनी अनुमती नाकारली होती.
१. अतिरिक्त पोलीस आयुक्त एम्. वेंकटेश्वरलु म्हणाले की, पदयात्रेच्या पार्श्वभूमीवर विविध संघटनांच्या २० जणांना खबरदारीचा उपाय म्हणून कह्यात घेण्यात आले आहे.
२. स्वामी परिपूर्णानंद यांनी यापूर्वी देवतांच्या विरोधात विधाने करणारे राज्यातील तेलुगु अभिनेते काथी महेश यांना अटक करण्याची मागणी केली होती.
३. स्वामी परिपूर्णानंद यांच्या नजरकैदेच्या विरोधात भाजपचे अध्यक्ष के. लक्ष्मण यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, आंदोलन करणे आणि पदयात्रा काढणे हा राज्यघटनेने दिलेला अधिकार आहे. राज्य सरकार हिंदुविरोधी विधाने करणार्यांवर कारवाई करत नसल्याने धार्मिक नेत्यांना रस्त्यावर उतरावे लागत आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात