Menu Close

सनातन संस्थेवर बंदी नको, यासाठी मंगळूरू (कर्नाटक) येथे हिंदुत्वनिष्ठांचा मोर्चा

हिंदु कार्यकर्त्यांची हत्या झाल्यावर मौन बाळगणारे केवळ पुरोगामी विचारवाद्यांची हत्या झाल्यावर जागे होतात ! – कु. चैत्रा कुंदापूर, हिंदु युवा कार्यकर्त्या

मंगळूरू (कर्नाटक) : ईश्‍वरी शक्तीवर श्रद्धा असणार्‍या हिंदू संघटनांचा नाश कोणीच करू शकणार नाही. हिंदूंची शक्ती सहन न झाल्याने हिंदूंवर खोटे आरोप करण्यात येत आहेत. सनातन संस्थेला आरोपी ठरवून सनातनच्या आश्रमांचे अन्वेषण केल्यास केवळ संतांचा सत्संग मिळेल, आरोपी मिळणार नाहीत. पुरो(अगो)गामी अन्वेषण यंत्रणांवर दबाव निर्माण करून अन्वेषणाची दिशा भरकटवत आहेत. हिंदू कार्यकर्त्यांची हत्या झाल्यावर हेच पुरो(अधो)गामी आवाज काढत नाहीत, असे प्रतिपादन युवा हिंदु कार्यकर्त्या कु. चैत्रा कुंदापूर यांनी येथे केले. सनातन संस्थेवर बंदी घालण्याच्या मागणीच्या विरोधात ४ सप्टेंबरला येथे मोर्चा काढण्यात आला होता. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ मोर्च्याचा शेवट झाल्यानंतर तेथे झालेल्या सभेमध्ये त्या बोलत होत्या. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राज्य समन्वयक श्री. गुरुप्रसाद गौडा यांनीही मार्गदर्शन केले. या मोर्च्याला सनातनचे संत पू. रमानंद गौडा यांची वंदनीय उपस्थिती लाभली होती.

क्षणचित्रे

१. रस्त्यातून जाणारे लोक मोर्च्याचे चित्रीकरण करत होते आणि सनातनचे समर्थन करत होते.

२. सुरक्षिततेसाठी ३० पेक्षा अधिक पोलीस उपस्थित होते.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *