Menu Close

वर्धा येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भाविकांचे प्रबोधन !

वर्धा : ३ सप्टेंबर या दिवशी येथील महादेव मंदिर उत्सव समितीच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त जमलेल्या भाविकांना हिंदु जनजागृती समितीच्या सौ. भक्ती चौधरी यांनी मार्गदर्शन केले. या वेळी ‘त्यांनी भगवान श्रीकृष्णाची कृपा संपादन करण्यासाठी श्रीकृष्णाचा नामजप कसा करायचा ?’, याविषयी सांगून सर्व भाविकांकडून नामजप करून घेतला, तसेच ‘धर्मशिक्षण प्रत्येकाने घेऊन आपले मन सुसंस्कारीत करून पुढील पिढी सुसंस्कारीत कशी करायची ?’, याविषयी प्रबोधन केले. याचा लाभ २०० भाविकांनी घेतला.

क्षणचित्रे

१. या वेळी उपस्थितांनी धर्मशिक्षणवर्गाची मागणी केली.

२. मंदिराचे अध्यक्ष श्री. चंद्रदेव यादव यांनी स्वत:च्या खर्चाने धर्मशिक्षणवर्गाची माहिती देणारा १ फ्लेक्स छापण्याची तयारी दर्शवली.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *