आज अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदूंच्या धार्मिक भावना वारंवार पायदळी तुडवल्या जातात ! त्या विरोधात सरकार, प्रशासन आणि पोलीस काहीही करत नाही ! आता न्यायालयानेही अशी भूमिका घेतल्यास हिंदूंनी धार्मिक भावना दुखावल्या जात असतांना त्यांनी कोणाकडे आशेने पहावे ?
नवी देहली : हिंदु महिला आणि मंदिरातील पुजारी (ब्राह्मण) यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण असणारे मल्ल्याळी लेखक एस्. हरिश यांच्या ‘मिशा’ (मिशी) नावाच्या पुस्तकावर बंदी घालण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. याचिकाकर्ते एन्. राधाकृष्णन् यांनी पुस्तकातील काही भाग वगळण्याची मागणी केली होती. हे पुस्तक एका मल्ल्याळी नियतकालिकात क्रमशः प्रकाशित केले जात होते; मात्र विरोधानंतर ते बंद करण्यात आले होते. न्यायालयाने म्हटले की, पुस्तक तुकड्या तुकड्यामध्ये नाही, तर संपूर्ण वाचले पाहिजे.
यापूर्वीच्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने म्हटले होते की, पुस्तकांवर बंदी घालणे, ही चुकीची प्रथा आहे; कारण यामुळे विचारांचा प्रवाह बाधित होतो. सध्याच्या इंटरनेटच्या युगामध्ये अशा गोष्टींना अधिक महत्त्व देण्याची आवश्यकता नाही.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात