डोंबिवली : ठाणे जिल्ह्यातील शिवसेना आणि भाजप यांच्या आमदारांच्या हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगढ या राज्यांचे संघटक श्री. सुनील घनवट यांनी भेट घेतली. या वेळी आमदारांनी ‘आमचा सनातन संस्थेला पाठिंबा आहे’, असे सांगितले. या वेळी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाममंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनाही निवेदन देण्यात आले.
१. भिवंडी येथील भाजपचे आमदार श्री. महेश चौगुले यांना श्री. सुनील घनवट यांनी संपर्क केला. या संपर्कात सनातन संस्थेवर, तसेच हिंदु जनजागृती समितीवर कशा पद्धतीने खोटे आरोप करण्यात येत आहे आणि जे सनातनचे साधक नाहीत त्यांनाही साधक म्हणून सांगण्यात येत आहे. हा सर्व अन्याय चालू आहे. त्यासाठी आपले सहकार्य अत्यावश्यक आहे. आपण या संदर्भात आम्हाला काय साहाय्य करू शकता, असे विचारले. तेव्हा श्री. चौगुले यांनी, ‘आम्ही तुमच्या पाठीशी आहोत’, असे सांगितले. तसेच ‘आपण सध्या वाट बघू. सनातन संस्थेवर बंदीचा प्रस्ताव जर आला, तर आम्ही त्याला विरोध करू,’ असे आश्वासन दिले.
२. मुरबाड येथील भाजपचे आमदार श्री. किसन कथोरे यांना कल्याण येथे संपर्क केला तेव्हा आमदार श्री. कथोरे म्हणाले, ‘‘मी या संदर्भात नेमकी परिस्थिती काय आहे, हे जाणून घेतो. तुम्हाला कसे साहाय्य करता येईल, ते मी बघतो.’’
३. भिवंडी येथील शिवसेनेचे आमदार श्री. रूपेश म्हात्रे यांना संपर्क केल्यावर त्यांनी, ‘‘शिवसेना हा हिंदुत्वनिष्ठ पक्ष आहे आणि तुम्ही सर्वजण सुद्धा हिंदुत्वाचेच कार्य करत आहात, म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत’, असे सांगितले.
४. त्यानंतर कल्याण येथील भाजपचे आमदार श्री. नरेंद्र पवार यांनाही संपर्क केला. तेव्हा त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘सध्या आपण वेट अँड वॉच करूया. भारतीय जनता पक्ष आपल्या पाठीशी आहे’, असे आश्वासन दिले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात