Menu Close

मुंबई : युवतीवर अनन्वित लैंगिक अत्याचार करून धर्मांतरास बळजोरी करणार्‍या धर्मांधाला अटक

धर्मांधांच्या विकृतीची आणि वासनांधतेची परिसीमा !

मुंबई : युवतीचा लैंगिक छळ करून तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव आणणार्‍या सय्यद आमिर समीर सय्यद मन्सूर हुसेन उपाख्य शेरोज खान (वय २७ वर्षे) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून ओशिवरा पोलिसांनी अंधेरी परिसरातून त्याला अटक केली आहे. गुन्हेगार धर्मांध हा डॉ. झाकीर नाईक याचा कट्टर समर्थक आहे. तो अबू सालेम आणि दाऊद यांचा जवळचा मित्र असल्याचे, त्याच्याकडे पाकिस्तानी पारपत्र असल्याचे त्याने पीडित युवतीला सांगितले होते. (धर्मांधांना आतंकवादासाठी चिथावणी देणारे देशद्रोही डॉ. झाकीर नाईक यांच्यावर भारतात येण्यास बंदी घालण्याची हिंदूंनी केलेली मागणी योग्यच आहे, हेच या घटनेतून लक्षात येते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

१. पीडित युवतीची सामाजिक माध्यमांवरून शेरोज खान याच्याशी ओळख झाल्यामुळे ती रमझान ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या घरी गेली होती. त्या वेळी शीरकुर्मामधून गुंगीचे औषध देऊन धर्मांधाने तिच्यावर लैंगिक अत्याचार करून त्याचे चित्रीकरण केले. (मैत्री कोणाशी करायची, हे आतातरी युवती लक्षात घेतील का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

२. धर्मांधाने तिला अडीच मास घरी कोंडून ठेवले आणि वारंवार अत्याचार करून अश्‍लील चित्रीकरण केले. त्याचे व्हिडिओ तिला वारंवार दाखवून सामाजिक माध्यमांवरून प्रसारित करण्याची धमकी दिली. तिने व्हिडिओ पाहिला नाही, तर तो तिला अमानुष मारहाण करत होता. ती स्वेच्छेने आत्महत्या करत असल्याचे त्याने तिच्याकडून लिहून घेतले होते, तसेच ५ ते ६ कोर्‍या कागदांवर स्वाक्षर्‍या घेतल्या होत्या.

३. पीडित युवतीवर मुसलमान धर्म स्वीकारण्यासाठी धर्मांध बळजोरी करत होता. हिजाबमुळे घाम येत असून डोके दुखत असल्याने त्याने युवतीचे हातपाय बांधून केस कापले. याला तिने विरोध केल्यावर कात्री डोळ्यांत घालण्याची धमकी दिली. धर्मांध तिच्याकडून कलमा वाचून घेत होता. त्यात काही चुका झाल्यास तिचे शारीरिक आणि मानसिक शोषण करत होता. मुसलमान धर्म न स्वीकारल्यास दलालाकडे विक्री करण्याची धमकी त्याने दिली होती. (हे आहे धर्मांधांचे खरे स्वरूप ! गुन्हेगार धर्मांध असल्याने तथाकथित मानवाधिकारवाले आणि स्त्रीमुक्तीवादीवाले याविषयी मूग गिळून गप्प असतात, हे लक्षात घ्या ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) त्याने २ युवतींची नावे घेऊन यापूर्वी त्यांच्या संदर्भात असे केल्याचे सांगितले.

४. ३० जून ते ४ जुलै या काळात त्याने युवतीला घरी जाऊ दिले आणि परत न आल्यास अ‍ॅसिड फेकण्याची धमकी दिली होती.

५ जुलैला ती परत आल्यावर धर्मांधाने तिला पुन्हा घरामध्ये कोंडून ठेवले. (अन्यायाचा वैध मार्गाने प्रतिकार करण्याचे मनोबल मिळण्यासाठी युवतींनी स्वरक्षण प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

५. धर्मांध घरात नसतांना पळून जाऊन युवतीने नातेवाइकांच्या साहाय्याने पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. गुन्हेगार धर्मांधाला १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली असून त्याने अन्य युवतींवर अशाच प्रकारे अत्याचार केले का, याचा पोलीस शोध घेत आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *