शिकागो (अमेरिका) येथील विश्व हिंदु संमेलन
अन्य कोणी काही करण्यापेक्षा पंतप्रधानांनी भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्यासाठी राज्यघटनेत दुरुस्ती करावी ! असे केल्यास अनायसेच भारतातील ‘हिंदु’ हिंदुत्वाशी जोडले जातील !
शिकागो (अमेरिका) : वाघ एकटा असला, तर जंगली कुत्रेही त्याला घेरून हरवू शकतात. त्यामुळे हिंदूंनी संघटित होऊन कार्य केले पाहिजे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. ते येथे आयोजित दुसर्या ‘वर्ल्ड हिंदु काँग्रेस’ (विश्व हिंदु संमेलन) या कार्यक्रमात बोलत होते. ‘हिंदु कधी संघटित होत नाहीत’, अशी खंतही त्यांनी या वेळी व्यक्त केली. (हिंदू संघटित होण्याचा प्रयत्न करू लागले, तर स्वार्थामुळे हिंदूच आणि त्यांच्या संघटना त्यांचे पाय खेचण्याचा प्रयत्न करतात, हेही तितकेच सत्य आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
हिंदुत्वाशी अधिकाधिक लोकांना जोडता येण्याचा मार्ग शोधा ! – पंतप्रधान मोदी
या संमेलनाच्या प्रारंभी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश वाचून दाखवण्यात आला. त्यात मोदी यांनी, ‘हिंदु दर्शन’च (हिंदूंचे दर्शनशास्त्रच) सर्व समस्या दूर करू शकते. औद्योगिक युगामध्ये या संमेलनात उपस्थित असणार्या प्रतिनिधींना मी आवाहन करतो की, त्यांनी अशा पद्धतींचा विचार करावा ज्याच्या वापरामुळे हिंदुत्वाशी अधिकाधिक लोकांना जोडता येऊ शकतेे’, असे सांगितले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात