प्रत्येक वेळी धर्मांध शस्त्रासह हिंदूंवर आक्रमण करून त्यांना मारण्याच्या उद्देशाने येतात. एकही पुरोगामी आणि प्रसारमाध्यमे याविषयी चकार शब्द बोलत नाहीत. धर्मांधांच्या विरोधात बोलायचे म्हटले, तर पुरोगामी आणि प्रसारमाध्यमे शेपूट घालून बसतात, हे लक्षात घ्या ! त्यांची अरेरावी केवळ हिंदुत्वनिष्ठांवर चालते !
संभाजीनगर : ७ सप्टेंबर या दिवशी बुढीलेन या भागात रात्री ११ वाजता हिंदु महिलेला रिक्शाचालकाचा धक्का लागल्यावर त्याचा जाब विचारला म्हणून धर्मांधांनी संतप्त होऊन मारहाण करणे चालू केले आणि परिणामी दंगल उसळली. या वेळी धर्मांधांनी जोरदार दगडफेक केली. हिंदूंनी त्याला प्रतिकार केला. या वेळी धर्मांधांजवळ लाठ्या, काठ्या, तलवारी असल्याचे लक्षात आले. (या दंगलीलाही नेहमीप्रमाणेच पूर्वनियोजित होती, असे हिंदू म्हणाले, तर चूक ते काय ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संतप्त जमावाने रिक्क्षाची तोडफोड केली. एक गाडी फोडण्यात आली. काही दुचाकीस्वारांनाही मारझोड झाली. यामुळे तणाव निर्माण झाला आणि दुकाने क्षणार्धात बंद झाली. पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिकार करत दंगल नियंत्रणात आणली. त्यामुळे काही कालावधीत दंगलखोर पळून गेले. अचानक उसळलेल्या दंगलीमुळे या भागात प्रचंड तणाव निर्माण झाला. एक घंट्यात परिसराला छावणीचे स्वरूप आले. ३ महिन्यांपूर्वी येथे झालेल्या दंगलीत पोलीस पळून गेले होते. त्या वेळी शिवसैनिकांनी हिंदूंचे रक्षण केले. या वेळी मात्र पोलिसांनी दंगलखोरांना धडा शिकवला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात