Menu Close

वरूडा (जिल्हा अमरावती) : स्वरक्षण प्रशिक्षण वर्गातील युवतींकडून ग्रामस्तरीय बैठकीचे आयोजन

अमरावती : जिल्ह्यातील बडनेरा परिसरातील वरूडा या गावात हिंदु जनजागृती समितीकडून घेण्यात येणार्‍या स्वरक्षण प्रशिक्षण वर्गातील युवतींच्या पुढाकाराने ६ सप्टेंबर यादिवशी ग्रामस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले. या वेळी ५२ जण सहभागी झाले होते. या वेळी समितीचे जिल्हा समन्वयक श्री. नीलेश टवलारे यांनी राष्ट्र आणि धर्माची सद्य:स्थिती आणि हिंदु राष्ट्र स्थापनेची आवश्यकता यांविषयी मार्गदर्शन केले. समितीच्या सौ. अनुभूती टवलारे यांनी साधनेचे महत्त्व, कुलदेवता आणि दत्ताच्या नामजपाचे महत्त्व तसेच महिला सक्षमीकरण यांविषयी सूत्रे मांडली. बैठकीमध्ये १० मिनिटे सामूहिक नामजप करवून घेण्यात आला. नामजप केल्याने प्रसन्न वाटत असल्याचे सहभागींनी सांगितले.

वैशिष्ट्यपूर्ण !

१. बैठकीनंतर गावात महिलांसाठी नियमितपणे धर्मशिक्षणवर्ग घेण्याचे ठरले.

२. बैठकीनंतर १५ युवक भेटण्यासाठी आले. त्यांना समितीचे कार्य आवडल्याने गावातील गणेशोत्सवाच्या वेळी स्वरक्षण प्रशिक्षणवर्गाची प्रात्यक्षिके आणि हिंदु राष्ट्र स्थापनेची आवश्यकता याविषयी मार्गदर्शन करण्यास त्यांनी समितीच्या कार्यकर्त्यांना निमंत्रण दिले.

३. गणेशोत्सवानंतर युवकांसाठी स्वतंत्र स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग घेण्याचे ठरले.

४. गावातील ८ ते १० धर्मप्रेमी महिला प्रत्येक मासातून एकदा अमरावती शहरात सामूहिक सेवेसाठी येणार असल्याचे ठरले.

क्षणचित्रे आणि वैशिष्ट्यपूर्ण प्रतिक्रिया !

१. अंगणवाडी सेविका सौ. पाठक या महत्त्वाच्या कामानिमित्त बाहेर जाण्याचे रहित करून थोडावेळ बैठकीला उपस्थित राहिल्या. जातांना त्यांनी ‘मला कार्यक्रम सोडून जावे लागत आहे’, अशी खंत समितीच्या कार्यकर्त्यांकडे व्यक्त केली. गावात समितीचे कार्य चालू होण्यासाठी पुढाकार घेतल्याविषयी त्यांचे आभार मानण्यात आले. त्या वेळी त्या म्हणाल्या, ‘‘तुम्ही आभार मानू नका, एवढ्या चांगल्या कार्यात मला सहभागी होता आले, याविषयी मीच आभारी आहे.’’

२. स्वरक्षण प्रशिक्षणवर्गात येणार्‍या एका युवतीची आई म्हणाली की, देवाच्या कार्यात आम्ही आणि आमची मुलगी येऊ शकली, हे आमचे भाग्य आहे.

३. बैठकीनंतर ७ ते ८ पालकांनी त्यांच्या मुली समितीच्या स्वरक्षण प्रशिक्षणवर्गात येत असल्यापासून त्यांच्या वागण्यात सकारात्मक पालट झाल्याचे सांगितले.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *