Menu Close

सावदा (जळगाव) : हिंदूंच्या मालकीच्या दफनभूमीत हिंदूंनाच अंत्यविधी करू देण्यास धर्मांधांचा विरोध

हिंदूंनो, धर्मांधांची ही मुजोरी रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राविना पर्याय नाही !

  • प्रशासनावर २५०-३०० धर्मांधांचा दबाव टाकण्याचा प्रयत्न !
  • संघटित हिंदूंच्या विरोधानंतर अखेर अंत्यविधीस अनुमती मिळाली !

सावदा : येथे महानुभव पंथ स्वीकारलेल्या एका हिंदु व्यक्तीला दफन करण्यासाठी हिंदूंच्या मालकीच्या असलेल्या शहरातील पाडळसा रोडकडे असणार्‍या दफनभूमीत त्याचे आप्त तो मृतदेह घेऊन जात असतांना काही मुजोर धर्मांधांनी त्यास विरोध केला. ‘या जागेत आम्ही दफन करू देणार नाही’, अशी अरेरावी करत जमलेल्या शेकडो धर्मांधांनी हिंदूंवर आणि प्रशासकीय अधिकार्‍यांवरही दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.

या प्रकारामुळे संतप्त हिंदूंनी तो मृतदेह सावदा नगरपालिकेत आणला. स्थानिक हिंदुत्ववनिष्ठांनीही संघटितपणे धर्मांधांच्या मुजोरीला विरोध दर्शवत प्रशासनाला हिंदूंना त्यांचा अधिकार मिळवून देण्याची मागणी केली. त्यानंतर पोलीस प्रशासनाने मध्यस्थी करत हिंदूंना त्यांच्या दफनभूमीत अंत्यविधी करण्यास सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *