Menu Close

अमरावती : हिंदुत्वनिष्ठ सनातन संस्थेच्या पाठीशी उभे रहाण्यासाठी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना एकवटल्या

अमरावती : नालासोपारा प्रकरणानंतर काही संघटना आणि राजकीय पक्ष सनातन संस्थेवर बंदीची मागणी करत आहेत. सनातन संस्था समाजसाहाय्य आणि राष्ट्ररक्षणाचे कार्य करते. त्यासोबतच हिंदु समाजाला धर्मशिक्षण देते. सनातन संस्थेच्या अंतर्गत साधना करून अनेकांचे जीवन आनंदी झाले आहे. असे असतांनाही हिंदुत्वाचा आधारस्तंभ असलेल्या सनातन संस्थेवर बंदी आणणे म्हणजे एकप्रकारे हिंदु धर्मावरच बंदी आणण्यासारखे आहे आणि याच सूत्राचे गांभीर्य लक्षात घेऊन अमरावती जिल्ह्यातील श्रीराम सेना, योग वेदांत सेवा समिती, श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान, अखिल भारत हिंदू महासभा, भगवा सेना या पाच संघटनांकडून त्यांच्या कार्यकर्त्यांसह अतिरीक्त जिल्हाधिकारी श्री. खुशालसिंह परदेसी यांना सनातन संस्थेवर बंदी न आणण्याविषयी निवेदन सादर करण्यात आले.

या वेळी श्रीराम सेनेचे जिल्हाध्यक्ष श्री. विजय दुबे, श्रीराम सेनेचे शहराध्यक्ष श्री. अनिल शुक्ला, श्रीराम सेनेचे जिल्हा सचिव श्री. शिवकुमार छांगाणी, तसेच श्रीराम सेनेचे कार्यकर्ते श्री. ओम हंसवार, श्री. संतोष यादव, विश्‍व हिंदू परिषदेेचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश चिकटे, योग वेदांत सेवा समितीचे श्री. मानव बुद्धदेव, श्री. शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे श्री. निषाद जोध, अखिल भारत हिंदू महासभेचे श्री. विक्रांत अलगुजे, संग्रामसिंह परिहार, धर्मप्रेमी श्री. विवेक झाडे, श्री. विमल पांडे, श्री. ज्ञानेश्‍वर दंदे, श्री. उमेश मोवळे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. नीलेश टवलारे, श्री. आनंद डाऊ, सौ. अनुभूती टवलारे यांसह १८ धर्मप्रमी उपस्थित होते.

क्षणचित्र : ८ सप्टेंबर या दिवशी झालेल्या आंदोलनात स्वतःहून आलेले आणि अपंग असलेले श्री. ज्ञानेश्‍वर दंदे हे निवेदन देण्यासाठीही आले होते. त्यांना चालता येत नसल्याने त्यांची तीनचाकी सायकल बाहेर ठेवून भूमीवर बसत बसत  जिल्हाधिकार्‍यांच्या कार्यालयात आतपर्यंत आले.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *