Menu Close

‘आशु महाराज’ बनून आसिफ खान याच्याकडून लैंगिक शोषण

हिंदूंच्या आध्यात्मिक क्षेत्रात धर्मांधांचा ‘जिहाद’!

  • अशा धर्मांधांना रोखण्यासाठी केंद्र सरकार आणि भाजपच्या २० राज्यांतील सरकारे काय प्रयत्न करत आहेत किंवा करणार आहेत, हे त्यांनी हिंदूंना सांगायला हवे !
  • ‘लव्ह जिहादची माहिती नाही’, असे म्हणणारे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना आता आध्यात्मिक क्षेत्रातील ‘जिहाद’ही माहिती नसणारच !
  • यावरून हिंदु समाजाला खरे संत किंवा गुरु ओळखण्यासाठी धर्मशिक्षण देणे किती आवश्यक आहे, हेच दिसून येते.

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) : अनेक वर्तमानपत्रांत आणि वृत्तवाहिन्यांवरून ज्योतिष सांगणारा तथाकथित ‘ज्योतिषाचार्य आणि हस्तरेखा विशेषज्ञ’ आशु महाराज हा आसिफ खान असून त्याने येथील एका महिलेवर आणि तिच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. या प्रकरणी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून देहली पोलीस याचे अन्वेषण करत आहेत.

१. आसिफ खान ‘आशु बाबा’, ‘आशु भाई गुरुजी’ या नावानेही प्रसिद्ध होता. त्याची देहलीमध्ये अनेक घरे आहेत. त्यांतील एक घर प्रीतमपुरा येथील ‘तरुण एन्क्लेव्ह’मध्ये आहे, तसेच रोहिणी येथील सेक्टर-७ बीमधील सदनिकेमध्ये आश्रम बनवला आहे. येथे तो खोटी ओळख सांगून लोकांची फसवणूक करत होता.

२. पीडित मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, वर्ष २००८ मध्ये ती आसिफ खान याला उपचारानिमित्त भेटली होती. तेव्हा तिची मुलगी ६ वर्षांची होती आणि तिला पोलिओ झाला होता. तेव्हा खान या मुलीला विवस्त्र करून मालिश करत असे. हा प्रकार वर्ष २०१३ पर्यंत चालू होता. वर्ष २०१३ मध्ये आश्रमाच्या व्यवस्थापकाने मुलीला गुंगीचे औषध पाजून खान आणि त्याच्या सहकार्‍यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *