न्यायालयाने केवळ एवढ्यावरच न थांबता अशांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !
मुंबई : समाजातील जातीय सलोखा बिघडवण्याचे काम अशा याचिका करतात, असे न्यायालयात याचिका प्रविष्ट करून हिंदूंच्या सणांना लक्ष्य करणार्या याचिकाकर्त्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने फटकारले. ‘दसर्याच्या रावणदहनाच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्यात यावी’, तसेच ‘शासनाच्या ‘गणेश सजावट स्पर्धे’वर बंदी घालावी’, अशी मागणी ‘नागरी हक्क संरक्षण मंच’च्या वतीने उच्च न्यायालयात करण्यात आली होती.
या याचिकेवर न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती विनय देशपांडे यांच्या खंडपिठासमोर सुनावणी घेण्यात आली. या वेळी खंडपिठाने याचिकाकर्त्याला ‘यापुढे अशा याचिका प्रविष्ट करून नयेत’, अशी तंबीही देऊन याचिका मागे घेण्याचा आदेश दिला. (बहुसंख्य असूनही हिंदूंच्या सणांवर होत असलेला घाला, हा निधर्मी प्रणालीचा परिणाम होय ! त्यामुळे हिंदूंच्या हितासाठी हिंदु राष्ट्रच आवश्यक आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात