नागपूर : येथे श्री गणेशमूर्ती विसर्जनाकरिता मोठ्या प्रमाणात कृत्रिम हौदामध्ये विसर्जन करा असे शासनाकडून आवाहन केले जाते. धर्मशास्त्रानुसार श्री गणेशमूर्ती वहात्या पाण्यात विसर्जन केली पाहिजे. महापालिकेकडून निर्माल्यही कचर्याचा गाडीतून नेले जाते, यामुळे गणेशभक्तांची धार्मिक भावना दुखावल्या जातात, असे निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे नागपूर समन्वयक श्री. अतुल अर्वेन्ला यांना निवासी उपजिल्हाधिकारी श्री रवींद्र खजांजी यांना दिले. या वेळी त्यांनी ‘‘हा विषय पुढे कळवतो आणि योग्य तसे प्रयत्न करू’’, असे सांगितले.
या वेळी विश्व हिंदु परिषदेचे धर्मजागरण विभाग, नागपूरचे श्री. रमेश अग्रवाल, नारी सुरक्षा विभाग, इस्कॉन, तसेच हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांचे प्रतिनिधी आणि धर्माभिमानी कार्यकर्ते उपस्थित होते.
नागपूर येथे अनेक ठिकाणी प्रवचनाच्या माध्यमातून आणि स्थानिक गणेशोत्सव मंडळांना भेटून ‘गणेशमूर्तीचे नैसर्गिकरित्या वाहत्या पाण्यात विसर्जन करा’, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीकडून करण्यात येत आहे.