भाग्यनगर : तेलंगण राज्यातील यादगिरी गुट्टा भागात तेथील गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकार्यांसाठी ‘आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा ?’, याविषयी नुकत्यात एका शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यास ३० पदाधिकारी उपस्थित होते. ‘हिंदु देवालय रक्षण समिती’चे अध्यक्ष श्री. रवींद्र रेड्डी यांनी हे शिबिर आयोजित केले होते. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमचा प्रारंभ झाला. शिबिराचा उद्देश विनुता शेट्टी यांनी सांगितला.
१. हिंदु जनजागृती समितीचे तेलंगण राज्य समन्वयक श्री. चेतन गाडी यांनी आदर्श गणेशोत्सव कशा प्रकारे साजरा केला जावा आणि त्यातील अपप्रकार वैध मार्गाने कसे रोखावेत, यांविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. याशिवाय ‘हा उत्सव राष्ट्र आणि धर्म यांच्या हिताच्या दृष्टीने कसा साजरा करावा ?’, तसेच ‘या उत्सवाद्वारे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कसे कार्य करता येईल ?’, यांविषयीही मार्गदर्शन केले.
२. या वेळी उपस्थितांना ‘आदर्श गणेशोत्सव’ ही ध्वनीचित्रचकती दाखवण्यात आली.
३. याशिवाय गटचर्चाही आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा, यांविषयी चर्चा करण्यात आली. या वेळी २ गणेश मंडळांनी ‘उत्सवात मद्यपान करणार्यांना आमच्या मंडपात येण्यात बंदी घालू’, असे सांगितले.
४. एका मंडळाच्या प्रमुखांनी ‘उत्सवामध्ये चित्रपट गीते न वाजवता भक्तीगीते लावू’, असे सांगितले.
५. शिबिराला उपस्थित काही पदाधिकार्यांनी शिबिरात न आलेल्या मंडळांमध्ये जाऊन तेथील पदाधिकार्यांचे प्रबोधन करण्याचे नियोजन केले.