औरंगजेबी पोलिसांकडून ३ हिंदूंनाच अटक करून सुटका
श्री गणेशमूर्तीचे भंजन करण्याचा धर्मांधांकडून प्रयत्न
- भाजपच्या राज्यातही हिंदूंना त्यांचे सण आणि उत्सव धर्मांधांच्या दहशतीखाली साजरे करावे लागतात, हे लज्जास्पद ! काँग्रेसच्या राज्यात जे चालू होते, तेच भाजपच्या राज्यातही चालू आहे ! हिंदूंच्या सर्व समस्या सुटण्यासाठी हिंदु राष्ट्राविना पर्याय नाही !
- ‘आधी धर्मांधांचे आक्रमण सहन करा आणि नंतर पोलिसांकडून त्रास सहन करा’, अशी हिंदूंची दुःस्थिती झाली आहे ! हिंदूंना न्याय मिळणार तरी कधी ?
- या घटनेनंतर पोलिसांनी १४ सप्टेंबरला पहाटे ३ हिंदूंसह एका धर्मांधाला अटक केली. (केवळ धर्मांधच दंगल घडवतात, असे नव्हे, तर हिंदूही त्यासाठी उत्तरदायी असतात, हे दाखवण्याचा पोलिसांचा अश्लाघ्य प्रयत्न ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) ‘हिंदूंनी हे प्रकरण मिटवावे’, या कारणासाठी पोलिसांनी हिंदूंना अटक केल्याची चर्चा हिंदूंमध्ये आहे. नंतर अटक केलेल्या हिंदूंना सोडून देण्यात आले.
अमरावती – गणेशचतुर्थीला म्हणजे १३ सप्टेंबरला रात्री ९ वाजून १५ मिनिटांनी शहरातील फ्रेजरपुरा परिसरातील आलमगीर चौक या ठिकाणी काही गणेशोत्सव मंडळांच्या मिरवणुका एका मागून एक जात होत्या. त्या वेळी काही धर्मांध मुलांनी येऊन मिरवणुकीतील महिला आणि युवक यांना शिवीगाळ करणे चालू केले. मिरवणुकीतील गणेशभक्तांनी त्यांना विरोध केल्यावर अचानक धर्मांध युवकांनी दगडफेक करणे चालू केले. त्यानंतर त्यांनी लाठ्या, पाईप, लोखंडी सळ्या आणि बांबूही आणले. एवढेच नव्हे, तर या वेळी श्री गणेशाच्या मूर्तीला दगड मारून मूर्तीचे भंजन करण्याचाही प्रयत्न करण्यात आला; परंतु भाविकांनी मूर्तीचे रक्षण केले. या आक्रमणात ५ – ६ गणेशभक्त घायाळ झाले. या मिरवणुकीत लहान मुले दगडफेकीत घायाळ झाल्याचे समजते. या घटनेनंतर या भागात पोलिसांनी जमावबंदी लागू केली आहे. या वेळी पोलिसांनी हिंदूंची तक्रार प्रविष्ट करून घेण्यास टाळाटाळ केली. (असे पोलीस भारताचे कि पाकचे ? भाजपच्या राज्यातील पोलीस पीडित हिंदूंवर जर असा अन्याय करत असतील, तर हिंदूंनी कोणाकडे न्याय मागावा ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) पोलिसांनी पत्रकारांना मात्र माहिती देतांना ‘मुसलमान आणि हिंदू यांनी तक्रारी मागे घेतल्या आहेत’, असे खोटेच सांगितले. (हिंदूंची विश्वासार्हता गमावलेले पोलीस ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
१. येथील शिवशक्ती गणेशोत्सव मंडळावर आक्रमण करण्यासाठी धर्मांधांचा जमाव घटनास्थळी आला. त्या परिसरात धर्मांध महिलेचे बांबूचे दुकान आहे. तिने बांबू दिले. या ठिकाणी धर्मांधांनी श्री गणेशमूर्तीवर दगड फेकून तिचे भंजन करण्याचा प्रयत्न केला; परंतु एका हिंदु तरुणांनी हे दगड स्वतःच्या अंगावर झेलले आणि मूर्तीला भंग होण्यापासून वाचवले. (सर्व घटनाक्रम पहाता ही दंगल पूर्वनियोजित होती, हे दिसून येते. असे असतांना पोलीस झोपा काढत होते का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
२. घटनेची माहिती मिळताच शहरातील काही हिंदुत्वनिष्ठांनी घटनास्थळी भेट घेतली. त्या वेळी स्थानिक महिला आणि युवक यांनी सांगितले, ‘‘आमच्या परिसराच्या बाहेरील गुंड व्यक्तींनी येऊन केलेले पूर्वनियोजित आक्रमण आहे, अशी आम्हाला शंका आहे. आक्रमणकर्त्यांपैकी रहीम हा नुकताच कारागृहातून बाहेर आलेला आहे. पोलिसांनी आम्हाला न्याय द्यावा.’’ रहीम याला पूर्वी पोलिसांवर तलवारीने आक्रमण केल्याच्या कारणावरून अटक करण्यात आली होती. (भारतातील कायदे कसे कुचकामी आहेत, हेच यातून दिसून येते ! त्याच वेळी रहीम याला कठोर शिक्षा झाली असती, तर तो दंगल करण्यास धजावला नसता ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
३. धर्मांध महिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार देतांना ‘हिंदूंनी मशिदीत गुलाल टाकला’, अशी धादांत खोटी माहिती दिली; परंतु प्रत्यक्षात मशीद त्या ठिकाणाहून बरीच पुढे आहे आणि हिंदूंनी असे काहीच केले नव्हते. तसेच धर्मांधांनी ‘हिंदूंनी आमच्या घरात घुसून महिलांची छेड काढली’ अशी खोटी तक्रारही हिंदूंच्या विरोधात प्रविष्ट केली. (धर्मांधांच्या खांद्याला खांदा लावून हिंदुविरोधी कारवाया करणार्या धर्मांध महिला ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
४. हिंदु महिला तक्रार प्रविष्ट करण्यासाठी गेल्यावर मात्र पोलिसांनी त्यांना पोलीस ठाण्याबाहेरच उभे रहाण्यास सांगितले. तेथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चोरमले यांच्यादेखत धर्मांध महिलांनी ‘तुम्हाला प्रकरण वाढवायचे आहे का ?’, अशी हिंदूंना धमकी दिली. (स्वतःच्या समोर धर्मांध महिला हिंदूंना धमकावत असतांना काहीही न करणारे पोलीस हिंदूंचे रक्षण काय करणार ? अशा पोलीस अधिकार्याची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांकडे तक्रार करा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) या धर्मांध महिलांनी इतर धर्मांधांना भ्रमणभाष करून ‘सगळ्यांना घेऊन या’, असा निरोप दिला. तरीही पोलीस निरक्षकांनी काहीही कृती केली नाही; उलट हिंदु महिलांना ‘तुमच्या मुलांना अडकवू’ अशी धमकी दिली. (हतबल हिंदु महिलांसमोर मर्दुमकी दाखवणारे पोलीस धर्मांधांसमोर नांगी टाकतात ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात