- गोरक्षणाच्या वेळी होणार्या मारहाणीवरून आकांडतांडव करणारे पुरोगामी अशा घटनांच्या वेळी कुठे दडून बसतात ?
- हिंदूंच्या सणांच्या वेळी मुसलमानबहुल भागातून होणारी आक्रमणे रोखण्याविषयी देशातील एकतरी राजकीय पक्ष तोंड उघडतो का ?
थिरुनेवेली (तमिळनाडू) : थिरुनेवेली शहराजवळील शेनकोत्ताई या गावात १३ सप्टेंबरच्या रात्री श्री गणेशमूर्तीची मिरवणूक मुसलमानबहुल भागातून जात असतांना धर्मांधांनी मार्ग पालटण्यास सांगितला. त्यानंतर त्यांनी केलेल्या दगडफेकीमुळे येथे हिंसाचार झाला. यात ३ पोलिसांसह ८ जण घायाळ, तर काही वाहनांची हानी झाली. गेली अनेक वर्षे श्री गणेशमूर्तीची मिरवणूक याच मार्गाने नेण्याचा प्रघात होता. मिरवणुकीच्या वेळी पोलीस बंदोबस्त अपुरा असल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचे सांगण्यात येत आहे.
१. श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाच्या मूर्तीची मिरवणूक आयोजित करून मूर्तीची स्थापना वान्दिमारीचामांना मंदिराच्या प्रांगणात करण्यात येणार होती. मिरवणुकीत महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर होता. त्या वेळी काही धर्मांध तरुणांनी मिरवणुकीचा मार्ग पालटण्याचा हट्ट धरला. त्यावरून हिंदूंनी हा मार्ग अनेक वर्षांपासून प्रचलित असल्याने त्यांना विरोध केला. हा वाद पोलिसांच्या उपस्थितीत झाला.
२. अचानक मिरवणुकीवर दगड आणि दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा मारा करण्यात आला. दंगल भडकल्याचे लक्षात येताच ज्या रिक्शामध्ये मूर्ती होती त्याच्या चालकाने रिक्शा पळवून मंदिरासमोर नेली. या दंगलीत रस्त्यात उभी असलेली ७ चारचाकी वाहने आणि ३ रिक्शा यांची हानी झाली. तसेच दंगलखोरांनी २ दुकाने आणि एका एटीएम् केंद्राचीही हानी केली. पोलीस आणि महसूल अधिकारी यांनी दुसर्या दिवशी शांतता समितीची बैठक आयोजित केली होती.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात