नाशिक : हिंदु जनजागृती समिती गेल्या अनेक वर्षांपासून ‘आदर्श गणेशोत्सव मोहीम’ नाशिकमध्ये राबवत आहे, या मोहिमेचे स्थानिक प्रशासनाने नुकतेच कौतुक केले. हिंदु जनजागृती समितीकडून गणेशोत्सवातील तथाकथित प्रदूषणाचे कारण सांगून कृत्रिम तलाव आणि गणेशमूर्ती दान या धर्मबाह्य संकल्पना राबवून गणेशमूर्तीची घोर विटंबना तातडीने थांबवण्याविषयी स्थानिक प्रशासनाला निवेदन देण्यात आले. नाशिकचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन् बी. नाशिकचे उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, नाशिक महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी नितीन उपासनी यांना निवेदन देण्यात आले. या वेळी अधिकार्यांनी समितीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. ‘‘तुम्ही चांगली जनजागृती करत आहात’’, असे सांगून या मोहिमेचे त्यांनी कौतुक केले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. रवींद्र सोनइकर, सौ. प्राची कुलकर्णी, सनातन संस्थेच्या सौ. वंदना ओझरकर या उपस्थित होत्या.