गोपालगंज (बिहार) : येथील काही गावांमध्ये हिंदु जनजागृती समितीकडून हिंदु धर्मजागृती संदर्भात बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. यात हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी राष्ट्रप्रेमी आणि हिंदु धर्मावर श्रद्धा असणार्या हिंदुत्वनिष्ठांचे संघटन करणे, राष्ट्र आणि धर्मा यांवरील आघात समोर आणणे, हिंदु राष्ट्र स्थापनेचे महत्त्व सर्वांपर्यंत पोहोचवणे आणि त्यांना धर्मकार्यासाठी प्रेरित करणे आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रशांत वैती आणि श्री. वसंत सणस यांनी याविषयी मार्गदर्शन केले. तसेच समितीकडून चालवण्यात येणार्या विषयासंदर्भातील उपक्रमांची माहिती दिली. काही धर्मप्रेमींनी धर्मसभा आयोजित करण्याविषयी अनुकूलता दर्शवली.
हिंदु जनजागृती समितीकडून गोपालगंज (बिहार) येथे हिंदु धर्मजागृती बैठकांचे आयोजन
Tags : Hindu Janajagruti Samiti