- भारतातील धर्मनिरपेक्षता ही थोतांड आणि ढोंग आहे, हे आता देशातील जनतेला म्हणजेच हिंदूंना कळू लागले आहे. त्यामुळे ते हिंदु राष्ट्रवादाकडे वाटचाल करू लागले आहेत. यामुळे भारतातील तथाकथित पुरोगामी आणि विदेशी यांना पोटशूळ उठला आहे. त्यामुळेच ते याचा कांगावा करू लागले आहेत !
- भारत हे ‘हिंदु राष्ट्र’ होते आणि पुढे असणार आहे आणि त्यासाठी हिंदू प्रयत्न करत असतील, तर तो त्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे. त्यामुळे अमेरिकेने भारताच्या या अंतर्गत गोष्टींमध्ये नाक खुपसू नये !
वॉशिंग्टन : भारतीय राज्यघटनेद्वारे धार्मिक स्वातंत्र्याचे रक्षण करण्यात आले आहे. भारतात हिंदूंची संख्या सर्वाधिक आहे; मात्र गेल्या काही दशकांत भारतामध्ये ‘हिंदु राष्ट्रवाद’ ही एक उदयोन्मुख राजकीय शक्ती म्हणून समोर येत आहेे. त्यामुळे भारताच्या धर्मनिरपेक्षतेला हानी पोहोचत आहे. तसेच देशातील धार्मिक स्वातंत्र्यावर नवीन आक्रमणांचे कारण ठरत आहे, असा निष्कर्ष अमेरिकेच्या ‘काँग्रेस रिसर्च सर्व्हिस’ या संसदीय समितीने तिच्या अहवालात नोंदवला आहे. त्यात चेतावणी दिली गेली आहे की, सामाजिक माध्यमांद्वारे बहुसंख्यांकडून करण्यात येणार्या हिंसेला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या समर्थन दिले जात आहे. (भारतात बहुसंख्यांकांकडून नव्हे, अल्पसंख्यांकांकडून बहुसंख्यांकांवर आक्रमणे होत आहेत, हे आतापर्यंत कोणीही सांगत नाही, हेच एक मोठे षड्यंत्र आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
१. या अहवालात राज्यस्तरावरील धर्मांतरविरोधी कायदे, गोरक्षणासाठी कायदा हातात घेणे, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आक्रमण आणि अशासकीय संघटनांच्या चळवळींमुळे भारतातील धर्मनिरपेक्ष परंपरांना हानी पोहोचत आहे, असे निदर्शनास येत आहे, असे म्हटले आहे. (भारतात कधीही धर्मनिरपेक्ष परंपरा नव्हती आणि पुढेही नसणार; कारण भारत हा धर्माधिष्ठित देश होता आणि पुढे असणार आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
२. हा अहवाल संसदेचा अधिकृत अहवाल नाही, तर खासदारांची मते आहेत. हा अहवाल स्वतंत्र विशेषज्ञ बनवतात आणि त्यावर सर्व खासदारांनी योग्य निर्णय घ्यावा, असा विचार असतो.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात