Menu Close

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या धर्मांधावर गुन्हा नोंद

हिंदूंनो, धर्मांधांना तुमच्या मुलींकडे पहाण्याचे धैर्य होणार नाही, असे संघटन निर्माण करा !

नगर : शहरातील तोफखाना परिसरात रहाणार्‍या अकरा वर्षांच्या मुलीवर शेजारीच रहाणार्‍या धर्मांधाने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून आरोपी असफर लतिफ सय्यद (वय २४ वर्षे, रा. नगर) याला पोलिसांनी अटक केली. आरोपीच्या आईने अत्याचारासाठी साहाय्य केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

३० ऑगस्टला मुलगी ही घराबाहेर खेळत असतांना आरोपीने मुलीला छतावर नेऊन अत्याचार केले. त्यानंतर शारीरिक त्रास होऊ लागल्याने मुलीने झालेला प्रकार घरच्यांना सांगितला. त्यानंतर मुलीच्या इतर नातेवाइकांना आणि परिसरातील नागरिकांना ही माहिती दिली. यापूर्वीही २ वेळा आरोपीने तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केल्याचे पोलीस चौकशीत उघड झाले आहे. या घटनेनंतर तोफखाना परिसरात काही वेळ तणाव निर्माण झाला होता. परिसरातील नागरिकांनी एका सभागृहात बैठक घेऊन या घटनेचा निषेध करत आरोपीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *