‘लव्ह जिहाद’च्या वेळी ‘ते प्रेम असते’ असे म्हणणारे या प्रकरणात काहीच बोलणार नाहीत !
कोलकाता : एका हिंदु मुलाशी प्रेमसंबंध ठेवल्याचा राग येऊन धर्मांध पिता-पुत्रांनी १९ वर्षीय मुलीची पूर्व बर्धवान जिल्ह्यात क्रूरपणे हत्या केली. या आरोपावरून त्या दोघांना पोलिसांनी कोलकाता येथून अटक केली.
१. मुसलमान कुटुंब बिहार राज्यातील मुझफ्फरपूर येथील रहिवासी असून त्यांची मुलगी जेहाना खातून हिचे त्याच गावातील किरण कुमार या २० वर्षीय मुलाशी प्रेमसंबंध होते. पुढे किरण कुमार नोकरीनिमित्त मुंबई येथे रहाण्यास गेला. तरीही त्या दोघांचे भ्रमणभाषवर बोलणे होत होते. या संबंधांना जेहानाच्या घरातून विरोध होता. त्यांनी किरण कुमार यालाही ‘जेहानाशी संबंध ठेवू नको’, अशी धमकी दिली होती. जेहाना हिला घरी मारहाण होत असे आणि तिला घराबाहेर जाण्यास मनाई होती.
२. जेहानाचे वडील मुस्तफा आणि भाऊ जाहिद हे कोलकाता येथे चालक म्हणून नोकरी करत असत. या दोघांनी जेहाना हिला ‘तिचे किरण कुमार याच्याशी विवाह लावून देतो’, असे सांगून कोलकाता येथे बोलावले. ती तेथे आल्यावर त्या दोघांनी तिला वाहनातून बर्धवान येथे नेले आणि तिचा गळा दाबून ठार केले. तिची ओळख पटू नये; म्हणून तिचा चेहरा दगडाने ठेचून विद्रूप केला.
३. जेहानाचा मृतदेह पोलिसांना ३१ ऑगस्ट या दिवशी नाबाग्राम-दुर्गापूर रस्त्यावर सापडला. शवविच्छेदन करतांना जेहानाच्या मांडीवर काही दूरध्वनी क्रमांक लिहिलेले आढळले. त्यावरून तपास करून पोलिसांनी किरण कुमार याचा माग काढला. त्याने दिलेल्या माहितीवरून जेहानाच्या हत्येच्या प्रकरणाची उकल झाली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात