चीनच्या या कृतीवर भारतातील तथाकथित पुरो(अधो)गामी आणि कम्युनिस्ट पक्ष काही बोलतील का ?
बीजिंग : चीनमधील कम्युनिस्ट सरकारने बीजिंग आणि अन्य भागात रहाणार्या ख्रिस्त्यांचे सर्व चर्च बंद केले आहेत, तसेच तेथे बायबल जाळून क्रॉसही नष्ट करण्यात येत आहेत. त्यामुळे येथील हेनान प्रांतातील ख्रिस्त्यांसाठी प्रार्थना करण्यास कोणतीही जागा नसल्याचे समोर आले आहे. तसेच ख्रिस्त्यांना त्यांची त्यांच्या धर्मावरील श्रद्धा सोडून देण्यासाठी कागदावर स्वाक्षर्याही घेण्यात येत आहेत, असा दावा पाद्री आणि चीनवर लक्ष ठेवणार्या गटांकडून केला जात आहे.
१. मध्य चीनमधील कॅथलिक चर्चच्या बाहेर मुलांना प्रार्थनेमध्ये सहभागी होऊ नये; म्हणून फलक लावण्यात आले आहेत. अनेक चर्च अवैध ठरवून पाडली जात आहेत.
२. चर्चवरील क्रॉस काढून टाकण्यात आले आहेत. तसेच चर्चकडून चालवण्यात येणारे शिशु वर्गही बंद करण्यात आले आहेत. चर्चवरून राष्ट्रध्वज फडकावण्याबरोबर राज्यघटना ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. सार्वजनिक स्थानावरून धार्मिक प्रतिमा हटवण्यासाठीही सांगण्यात आले आहे.
३. चीनमध्ये सध्या ख्रिस्त्यांमध्ये दोन गट आहेत. एक गट सरकारकडून नियुक्त धर्माधिकारी मानणारा, तर दुसरा व्हॅटिकनच्या नियमांना मानणारा आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात