धर्मांधांनी श्री गणेश मंदिर उद्ध्वस्त केल्यावर दंगल
- सर्वत्र हीच परिस्थिती झाल्यास हिंदूंना अशाच मार्गाचा अवलंब करावा लागला, तर आश्चर्य वाटू नये !
- आतातरी हिंदूंना अशा घटना रोखण्यासाठी आणि स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करायला हवी, हे लक्षात येईल का ?
चेन्नई : तमिळनाडूतील शेनकोत्ताई गावात १४ सप्टेंबरला श्री गणेशमूर्ती नदीमध्ये विसर्जन करण्यात आली. सुमारे ३० हून अधिक मूर्तींचे विसर्जन करून हिंदू घरी परतल्यावर एका हिंदूच्या घरावर धर्मांधांकडून पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आला. तसेच एक लहान गणेश मंदिर उद्ध्वस्त करण्यात आले. त्यानंतर येथे दंगल भडकली आणि अनेक हिंदूंची घरे आणि दुकाने जाळण्यात आली. अनेक वाहनांची हानी करण्यात आली. शेनकोत्ताई या गावातील हिंदूंनी याचा निषेध म्हणून १५ सप्टेंबरपासून मुसलमानांवर सामाजिक आणि आर्थिक बहिष्कार घातला आहे.
१. भारतातील इतर राज्यांप्रमाणेच तमिळनाडूतही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो; मात्र गेली काही वर्षे नास्तिक असलेल्या इ.व्ही. रामास्वामी नायकर यांच्या प्रभावाखालील डी.एम्.के. आणि अण्णा डी.एम्.के. या राजकीय पक्षांनी या उत्सवावर अनेक निर्बंध आणले. त्यामुळे इस्लामी आणि ख्रिस्ती धर्मांध शक्तींचे फावून त्यांनी एवढी दहशत निर्माण केली की, आता हिंदु धर्म आणि देवता यांचे अस्तित्व अल्पसंख्यांकांच्या दयेवर अवलंबून राहिले आहे. तमिळनाडूत हिंदूंना दुय्यम नागरिकांची वागणूक देण्यात येत आहे.
२. या धर्मांधांनी गेली काही वर्षे गणेशचतुर्थीच्या उत्सवावर अनेक अडचणी उभ्या केल्या. त्यात ते म्हणतील त्याच मार्गाने मिरवणुका नेण्यापासून ते मिरवणुकीत ‘गणपती बाप्पा मोरया’ आणि ‘भारतमाता की जय’ अशा घोषणा देणे अवैध ठरवण्यात आल्या. (याविषयी तथाकथित पुरोगामी आणि निधर्मी काही बोलणार नाहीत. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
३. थिरुनेवेली शहराजवळील शेनकोत्ताई या गावात हिंदु बहुसंख्य आहेत. गेली अनेक वर्षे श्री गणेशमूर्तीची मिरवणूक एका विशिष्ट मार्गाने नेण्याचा प्रघात होता. काही दिवसांपूर्वी या मार्गावर मुसलमानांची १०-१५ घरे झाली. या मार्गावर कुठलीही मशीद नाही. तरीही या मुठभर मुसलमानांनी मिरवणूक या मार्गाने नेण्यास विरोध दर्शवला. (मुठभरांपुढे नांगी टाकणारे हिंदू ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) १२ सप्टेंबरच्या रात्री श्री गणेशमूर्ती स्थापण्यासाठी मिरवणुकीने नेण्यात घेऊन जात असता तेथे जातीय तणाव निर्माण झाला. पोलीस आणि प्रशासन यांनी हस्तक्षेप केल्याने कोणतीही मोठी घटना घडली नाही.
श्री गणेशचतुर्थीच्या मार्गात पालट करणार्या पोलिसांना भाजपचे राष्ट्रीय सचिव एच्. राजा यांनी खडसावले : तमिळनाडूतील पोलीस भ्रष्टाचारी आणि हिंदुविरोधी !
पुडूकोत्ताई (तमिळनाडू) : तुम्ही हिंदूंना त्यांचे सण साजरे करू देण्यात अडथळे आणत आहात. तुम्ही खरे हिंदू नसून लाच स्वीकारता. उच्च न्यायालयाचा हवाला देऊन तुम्ही मनमानी करू शकत नाही. तुम्हाला पोलिसांचा गणवेश चढवायची लाज वाटली पाहिजे, अशा शब्दांत भाजपचे राष्ट्रीय सचिव एच्. राजा यांनी पुडूकोत्ताई जिल्ह्यात श्री गणेशचतुर्थीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीच्या मार्गात पालट करण्याच्या प्रस्तावावरून पोलिसांशी झालेल्या वादात त्यांनी पोलिसांना खडसावले. या घटनेची चित्रफीत सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाली असून त्यात एच्. राजा पोलिसांना खडसावतांना दिसत आहेत. राजा यांच्या विधानांचा द्रमुक पक्षाने निषेध केला असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अण्णाद्रमुक पक्षाचे मंत्री या घटनेचा विरोध करत आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात