Menu Close

ब्रिटनच्या ब्रिक्सन कारागृहात मुसलमान कैद्यांकडून अन्य धर्मीय कैद्यांचे धर्मांतर

धर्मांध कुठल्याही देशात असोत आणि कुठेही असोत, ते तेथील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवून दहशत निर्माण करतात, याचे उदाहरण !

लंडन : ब्रिटनच्या ‘ब्रिक्सन’ कारागृहात मुसलमान कैद्यांमुळे येथे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हे मुसलमान कैदी कारागृहातील अन्य धर्मीय कैद्यांचे बलपूर्वक धर्मांतर करत असल्याची माहिती समोर आली आहे. या कैद्यांनी कारागृहात आयोजित केलेल्या बायबलच्या वर्गामध्ये घुसून चिनी वंशाच्या शिक्षकांना मारहाण करत घोषणाबाजी केली. ब्रिक्सन कारागृह ब्रिटनमधील सर्वाधिक सुरक्षित कारागृह समजले जाते. कारागृहामध्ये मुसलमान कैदी संघटित होऊन येथे दहशत निर्माण करत आहेत. ते नेहमीच देशविरोधी विचार व्यक्त करत रहातात. त्यामुळे कारागृहातील सुरक्षारक्षक आणि त्यांच्यात नेहमीच वाद होत असतो. काही वेळेस ते सुरक्षारक्षकांवरही आक्रमण करतात, असे येथील अन्य कैद्यांनी सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *