मुंबईत वर्षभर शेकडो ठिकाणी दिवसातून ५ वेळा मशिदीतून बांग दिली जाते. अशी बांग देऊन ध्वनीप्रदूषण करणार्या धर्मांधांना असे सल्ले देण्याचे धारिष्ट्य मुंबई पोलीस दाखवत नाहीत ! इतकेच नव्हे, तर न्यायालयाने अवैध भोंगे काढण्याचा आदेश देऊनही पोलिसांनी २ वर्षे कारवाई न केल्याने लोकांना जनहित याचिका प्रविष्ट कराव्या लागत आहेत. पोलिसांना याविषयी काय म्हणायचे आहे ?
Every time you increase the volume, someone’s prayer for a peaceful celebration is let down #SayNoToNoisePollution pic.twitter.com/7NmWA0Y5A4
— Mumbai Police (@MumbaiPolice) September 16, 2018
मुंबई : गणेशोत्सवाच्या काळात ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी ‘ट्विटर’ या सामाजिक माध्यमाद्वारे हिंदूंना आवाहन केले आहे. ‘प्रत्येक वेळी तुम्ही आवाज वाढवता. त्यामुळे जे शांततेत उत्सव साजरा करण्यासाठी प्रार्थना करत असतात, त्यांचा अपेक्षाभंग होतो. हे लक्षात घेऊन ध्वनीप्रदूषण टाळा !’, असे आवाहन त्यामध्ये करण्यात आले आहे. मुंबई पोलिसांनी एक विज्ञापन प्रसारित केले आहे. त्यात ‘प्रार्थना नेहमी मूक असतात. त्या खोल हृदयातून येतात. ध्वनीप्रदूषण टाळा’, असा संदेश देण्यात आला आहे. (ध्वनीविषयक नियमांचे उल्लंघन करणार्या धर्मांधांना पोलीस हे का सांगत नाहीत ? पोलिसांना फुकाचे सल्ले देण्यासाठी हिंदूच भेटतात का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात