देशात गेली साडेचार वर्षे भाजपची सत्ता असतांना अशी स्थिती का आहे ? ती सोडवण्यासाठी सरकार काय करत आहे ?, हे त्यांने हिंदूंना सांगायला हवे !
अमरोहा (उत्तरप्रदेश) : लोकसंख्या वाढीचा दर पहाता लोकसंख्या नियंत्रण कायदा आणला न गेल्यास देशातील सामाजिक समरसता शेष रहाणार नाही आणि विकासही होणार नाही, अशी भीती केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी व्यक्त केली. (हा कायदा करण्यासाठी गिरिराज सिंह स्वत: पाठपुरावा करतील का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) ‘वर्ष १९४७ मध्ये देशाची लोकसंख्या ३३ कोटी होती आणि आज घोषित लोकसंख्या १२५ कोटी आहे. देशाच्या ५४ जिल्ह्यांंमध्ये हिंदूंची संख्या घटली आहे. ज्या भागात हिंदूंची संख्या अल्प झाली, तेथे राष्ट्रवाद कमकुवत होत आहे’, असेही ते म्हणाले.
सिंह पुढे म्हणाले की, हिंदूंची संख्या अल्प होणार्या ५४ जिल्ह्यांंपैकी १७ उत्तरप्रदेशातील, बिहारचे ४, आसाममधील १२, झारखंडमधील २, बंगालचे ९ आणि ५ जिल्हे केरळमधील आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात