राममंदिराला विरोध करणार्या धर्मांधांना याविषयी काय म्हणायचे आहे ?
नवी देहली : तुम्ही राममंदिर बांधा. त्याविषयी आम्हाला कोणतीही अडचण नाही. जर राममंदिर उभारले जात असेल, तर त्याच्या पायाभरणीचा दगड मी स्वतः ठेवीन, असे प्रतिपादन बाबरचा वंशज प्रिन्स याकूब हबीबुद्दीन तुसी यांनी केले आहे. शेवटचा बादशाहा बहादुर शाह जफर याचा वंशज असल्याचे तुसी दावा करतात.
१. भाग्यनगर येथे रहाणार्या तुसी यांनी म्हटले आहे की, बाबरने मरण्याच्या वेळी हुमायूंला त्याच्या मृत्यूपत्राविषयी सांगितले होते की, मीर बाकी याने अयोध्येत जे काही केले, त्यामुळे संपूर्ण तैमुरी खानदानवर कलंक लागला आहे. जर भारतावर राज्य करायचे असेल, तर संत आणि महंत यांचा सन्मान करा. मंदिरांचे रक्षण करा आणि एकसमान न्याय करा.
२. तुसी यांनी हेही सांगितले की, मीर बाकी याने अयोध्येत जे काही केले, त्यासाठी मी अयोध्येत जाऊन आणि संपूर्ण हिंदु समाजाची क्षमा मागितली आहे. हे प्रकरण लहानसहान मुसलमान नेत्यांचे नाही, तर बाबरच्या वंशजांचे प्रकरण आहे. आमच्या येथील एक विदुषक ओवैसी, तसेच मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड यांचा या प्रश्नाशी काहीही संबंध नाही.
३. तुसी यांनी दावा केला की, हे प्रकरण आमच्या अखत्यारीत आहे. मंदिर आणि मशीद असा प्रश्न नाही. या जागेवर मशीद बांधली जाऊ शकत नाही आणि नमाजपठण होऊ शकत नाही. त्यामुळेच आम्ही न्यायालयाला सांगितले की, ही संपत्ती बाबरची असेल, तर आम्ही येथे मंदिर बनवण्यासाठी अनुमती देत आहोत.
४. वर्ष २००२ मध्ये प्रिन्स तुसी आणि त्यांच्या परिवाराला न्यायालयाने बहादुर शाह जफरचा वंशज मानले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात