Menu Close

हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी वैध मार्गाने केलेल्या विरोधानंतर ‘लव्हरात्री’ चित्रपटाचे शीर्षक ‘लवयात्री’ केले

  • हिंदूंनो, संघटितपणे वैध मार्गाने कृती केल्यास विजय मिळतो, हे लक्षात घ्या आणि हिंदूंवरील, तसेच धर्मावरील प्रत्येक आक्रमणाच्या विरोधात अशाच प्रकारे संघटिपणे लढा द्या !
  • हिंदूंच्या नवरात्रोत्सवात ‘लव्ह जिहाद’चे प्रमाण वाढले आहे, तसेच या ‘नवरात्री’ या शब्दाचा अपभ्रंश करून ‘लवरात्री’ हा शब्द बनवल्याने धार्मिक परंपरांचे महत्त्व लोप पावून हिंदूंच्या उत्सवात असे अपपक्रार चालतात, असे यातून उद्धृत होत होते. या पार्श्‍वभूमीवर धर्मप्रेमी हिंदूंनी त्या विरोधात आवाज उठवला होता. त्यांना मिळालेले हे यशच आहे ! या यशाविषयी श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करूया !

मुंबई : अभिनेते सलमान खान यांनी निर्मिती केलेला ‘लवरात्री : यह कहानी है प्यार और मोहब्बत की’ असा शीर्षक असलेल्या चित्रपटाला हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी वैध मार्गाने  प्रखर विरोध केला. याची नोंद घेऊन अखेर सलमान खान यांनी चित्रपटाचे नाव पालटून ते ‘लवयात्री : अ जर्नी ऑफ लव्ह’ असे ठेवले आहे. याविषयी ट्वीट करून त्यांनी ही माहिती दिली. वाराणसी येथील हिंदु जागरण मंच, हिंदु जनजागृती समिती, तसेच समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या माध्यमातून अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी ऐन नवरात्रीत प्रदर्शित होत असलेल्या या चित्रपटाला वैध मार्गाने विरोध केला होता. सलमान खान यांनी ‘लवयात्री’ असे चित्रपटाचे नवीन नाव घोषित करतांना ‘ही ‘स्पेलिंग मिस्टेक’ (अक्षरातील चूक) नाही’ असे म्हटले आहे; मात्र नाव पालटण्याचे कारण लिहिणे त्यांनी टाळले आहे.

‘लवरात्री’ चित्रपटाचे नाव ‘लवयात्री’ होणे, हा हिंदूंच्या संघटित शक्तीचा परिणाम ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

हिंदूंच्या पवित्र अशा ‘नवरात्री’ उत्सवाच्या काळात आणि नवरात्री या नावाशी साधर्म्य असलेला ‘लवरात्री’ हा हिंदी चित्रपट प्रदर्शित करण्याचा घाट सिनेअभिनेते सलमान खान यांनी घातला होता. या विरोधात हिंदु जनजागृती समितीसह भारतभरातील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी रस्त्यावर उतरून वैध मार्गाने आंदोलने केली, तसेच गेल्या दोन मासांपासून केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळ (सेन्सॉर बोर्ड), प्रशासकीय अधिकारी, मंत्री आणि लोकप्रतिनिधी यांना निवेदने देण्यात आली होती. याचसमवेत बिहारमधील अधिवक्ता सुधीरकुमार ओझा यांनी मुझफ्फरपूर येथील न्यायालयात या चित्रपटाच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यासाठी याचिका प्रविष्ट केली होती आणि न्यायालयानेही पोलिसांना सलमान खान यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले होते. एकूणच या सर्वांचा परिणाम म्हणूनच सलमान खान यांनी चित्रपटाचे ‘लवरात्री’वरून ‘लवयात्री’ असे पालटले, हिंदूंच्या संघटित आणि वैध मार्गाने केलेल्या आंदोलनाचा परिणाम आहे.

सलमान खान यांनी जसे हिंदूंच्या तीव्र विरोधानंतर का होईना हिंदूंच्या धर्मभावनांची नोंद घेतली, तशी चित्रपट सृष्टीतील अन्य निर्मात्यांनीही घ्यावी. चित्रपटाचे नाव पालटले हे योग्य असले, तरी आम्ही प्रत्यक्ष चित्रपट पाहिलेला नाही. त्यामुळे चित्रपटात जर हिंदूंच्या देवता, धर्म, सण यांच्या संदर्भात आक्षेपार्ह संवाद, चित्रण असेल, तर त्याविरोधात पुन्हा आंदोलन छेडले जाईल.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *