Menu Close

हिंदु राष्ट्रात मुसलमानांना स्वीकारणे हेही हिंदुत्वच : सरसंघचालक मोहन भागवत

  • हिंदु राष्ट्रात मुसलमानांना स्थान असेल; मात्र मुसलमानांना ‘हिंदु राष्ट्र’ हवे आहे का ? हा मूळ प्रश्‍न आहे आणि याचे उत्तर त्यांनी द्यायला हवे !
  • भारत सध्या ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून घोषित नाही. त्यामुळे सध्याच्या भारतात हिंदूंनाच स्थान नाही, असेच चित्र आहे. ही स्थिती हिंदु राष्ट्रातच पालटली जाऊ शकते, हे लक्षात आलेले असल्याने भारताला प्रथम ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करणे महत्त्वाचे !

नवी देहली : हिंदुत्व म्हणजे समावेशकता आणि मुसलमानांना आपले मानणे हा त्याचाच एक भाग आहे. हिंदु राष्ट्र म्हणजे तेथे मुसलमानांना जागा नाही, असा होत नाही. जर आपण मुसलमानांना स्वीकारत नसू, तर ते हिंदुत्व नाही. हिंदुत्व हे भारतीयत्व आणि सर्वसमावेशकता आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी येथे केले. ‘विविधतेत एकता मानून सर्वांचा सर्वागीण विकास साधणे, हे हिंदुत्वाचे मूळ तत्त्व आहे. त्यामुळे येथील मुसलमान हिंदुत्वाला वर्ज्य नाही. ‘हिंदुत्व’ असा शब्द वापरायचा नसेल, तर नका वापरू, ‘भारतीय’ म्हणा; या शब्दाला संघाचा विरोध नाही’, असेही भागवत यांनी स्पष्ट केले. येथे आयोजित ‘भविष्यातील भारत’ या विषयावरील ३ दिवसीय व्याख्यानमालेतील दुसरे भाषण भागवत यांनी १८ सप्टेंबरला केले. त्यात संघासाठी हिंदुत्व म्हणजे काय, याचा अर्थ भागवत यांनी स्पष्ट केला.

सरसंघचालक भागवत यांनी मांडलेली सूत्रे पुढीलप्रमाणे

१. कोणीही शत्रू नसून प्रत्येकाला बरोबर घेऊन मानव विकासाचा हा विचार आहे आणि याच मूल्यांचा संग्रह म्हणजे हिंदुत्व आहे.

२. विदेशात राष्ट्र आणि राज्य संकल्पना वेगवेगळ्या केलेल्या आहेत. भारतातही राज्ये पालटली; पण राष्ट्र एकच राहिले असून त्याला आपण ‘सांस्कृतिक राष्ट्र’ मानतो. हिंदु ही निव्वळ धर्मसंकल्पनाही नाही, ती जीवनदिशा आहे.

३. भारतीय परंपरेत धर्म हा शब्द ‘धर्मशास्त्रा’पुरता मर्यादित नाही, तो ‘मानवधर्म’ या अर्थाने वापरला जातो. इंग्रजीत भाषांतर करतांना त्याला ‘रिलिजन’चे मर्यादित स्वरूप येते, म्हणजे पूजापाठ, कर्मकांड, मसीहा वगैरे अर्थाने ‘रिलिजन’ हा शब्द वापरला जातो; पण हिंदुत्वाचा धर्म म्हणजे विश्‍व हे कुटुंब. या संकल्पनेमुळेच प्रत्येक आक्रमणातून आलेली संस्कृती भारताने स्वीकारली. प्रत्येकाला सामावून घेण्याच्या मूल्यामुळे विदेशात हिंदुत्वाचा अर्थ समजावून सांगतांना धर्मपरिवर्तनाचा अट्टहास धरला नाही.

४. संपूर्ण समाजाला जोडायचे असेल, तर ‘राजकीय’ क्षेत्राच्या बाहेर राहूनच काम करावे लागते. त्यामुळे संघ राजकारण करत नाही. संघाला कोणत्याही राजकीय महत्त्वाकांक्षा नाहीत; पण राष्ट्रनीतीचा परिणाम देशातील सर्वांवर होत असतो. त्यामुळे राष्ट्रनीती काय असावी, यावर संघ विचार मांडणारच. म्हणूनच घुसखोरांच्या विषयावर संघाने उघडपणे मत व्यक्त केले आहे.

५. देशाचे सत्ताकेंद्र देहलीतच असून ते नागपूरवरून चालवले जात नाही. पंतप्रधानांना वा केंद्र सरकारमधील मंत्र्यांना नागपूरवरून दूरभाष करून राजकीय धोरणांवर अंकुश ठेवला जात नाही.

६. स्वयंसेवकांनी कोणत्या राजकीय पक्षात जाऊन काम करायचे, हे त्यांनी ठरवावे; पण ते अन्य पक्षांत जात नाहीत किंवा ते का येत नाहीत ?, याचा त्या पक्षांनी विचार करावा

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *