मुंबई : गणेशचतुर्थीच्या कालावधीत मुंबईतील कुलाबा येथे ससुन डॉक क्षेत्रात ‘व्हिक्टोरीनॉक्स’ या आंतरराष्ट्रीय आस्थापनाने केलेल्या विज्ञापनात श्री गणेशाचे चित्र विशिष्ट प्रकारच्या चाकूंपासून श्री गणेशाचे चित्र सिद्ध केलेले होर्डिंग लावले होते. काही धर्माभिमान्यांनी हिंदु जनजागृती समितीला संपर्क करून हे विडंबन थांबवण्याची विनंती केली. त्यानंतर हिंदु जनजागृती समितीने तिच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून १४ सप्टेंबर यादिवशी ट्वीट करून हे श्री गणेशाचा अवमान करणारे होर्डिंग काढण्यास आणि हिंदूंची क्षमा मागण्यास सांगितले. १८ सप्टेंबरला हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी ‘व्हिक्टोरीनॉक्स’ आस्थापनाने क्षमायाचना करून श्री गणेशाचे विडंबन करणारे होर्डिंग काढून टाकले. तसेच ‘भविष्यातही अशा प्रकारे श्री गणेशाचा अनादर होणार नाही’, असे आश्वासन दिले. हिंदूंच्या धार्मिक भावनांचा सन्मान करून श्री गणेशाचे विडंबन थांबवणार्या ‘व्हिक्टोरीनॉक्स’ आस्थापनाचे हिंदु जनजागृती समितीने आभार मानले आहेत.
वरील श्री गणेशाचे चित्र प्रसिद्ध करण्यामागे कोणाच्या धार्मिक भावना दुखावणे, हा हेतू नसून वस्तूस्थिती समजावी यासाठी प्रसिद्ध केले आहे. – संपादक, हिंदुजागृती