- पोलिसांनी असे सांगायला हा देश काय पाकिस्तान आहे का ? हिंदुबहुल भारतात नेहमी हिंदूंनाच पडती बाजू घ्यावी लागते ! अशी लोकशाही काय कामाची ?
- बर्याच ठिकाणी धर्मांधांचा जमाव श्री गणेशमूर्तीच्या विसर्जनाच्या मिरवणुकीवर दगडफेक करून दंगल घडवतो ! अशा वेळी पोलीस कुठे असतात ? विसर्जन मिरवणूक निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी धर्मांधांना अशा प्रकारे आदेश देण्याचे धारिष्ट्य पोलीस दाखवतील का ?
सातारा : मोहरमच्या निमित्ताने शहरातून ताबूताच्या मिरवणुका निघणार आहेत. ३५ वर्षांनंतर गणेशोत्सवाच्या काळात मोहरम येत आहे. ताबूताची मिरवणूक ज्या मार्गावरून जाणार आहे, त्या मार्गावरील गणेशोत्सव मंडपाच्या रचनेत पालट करण्याचा आदेश पोलिसांनी दिला आहे, असे सूत्रांकडून कळते.
या आदेशानंतर काही गणेशोत्सव मंडळांनी मोहरमच्या मिरवणुकीस अडथळा होऊ नये, यासाठी त्यांच्या मंडळांची रचना पालटून त्याचा आकार लहान केला आहे. एका गणेशोत्सव मंडळाने तर गणपती मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या जागेतही पालट केला आहे. (भारतात सर्वधर्मसमभाव राखण्यासाठी हिंदूच स्वतःच्या इच्छा-आकांक्षांना मुरड घालून अन्य धर्मियांशी जुळवून घेतात. हे आणखी किती वर्षे चालू द्यायचे ? आता हिंदूंनीच पोलिसांना याविषयी जाब विचारला पाहिजे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) पोलीस प्रशासनाने गणेशोत्सव मंडळांसमवेत बैठक घेऊन त्यांना ताबूताच्या मिरवणुकीसाठी जागा करण्याचा आदेश दिल्याचे समजते. (पोलिसांनी हिंदूंच्या मिरवणुका मशिदीवरून जातांना त्यांच्याशीही चर्चा करावी, अशी हिंदूंची अपेक्षा आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) याविषयी पोलीस आणि प्रशासनाकडून मंडळांवर दबाव आहे किंवा कसे, हे मात्र समजू शकलेले नाही.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात