धर्मशिक्षण न दिल्यानेच धर्मांतरे वाढली आहेत. सिंधी समाजाने एकत्र येऊन आपल्या धर्माविषयीची माहिती आणि महती समाजाला पटवून द्यायला हवी !
उल्हासनगर : ख्रिस्ती धर्मात प्रवेश करण्याचे लोण उल्हासनगरमध्ये फोफावले आहे. एक सहस्राहून अधिक सिंधी परिवारांनी पैशाच्या आमिषाला बळी पडून ख्रिस्ती धर्मात प्रवेश केला आहे. इतकेच नाही, तर मंदिरांमध्ये मेणबत्त्या पेटवून ख्रिस्ती धर्माचा प्रचारही करत आहेत. त्याविरोधात सिंधी समाजाच्या उपवासाच्या महापर्वाची सांगता करतांना सहस्रो सिंधी नागरिकांनी उल्हासनगरातील झुलेलाल आणि चालिया मंदिरात ३ लाख १९ सहस्र ४५० तुपाचे दिवे १८ सप्टेंबरला उजळवले. त्यामुळे परिसरात तुपाचा अक्षरशः घमघमाट पसरला असून धर्मांतर करणार्यांना या माध्यमातून चेतावणी दिला आहे. सिंधी नागरिक हे दिव्याऐवजी मेणबत्तीचा वापर करून धर्मांतरासाठी प्रवृत्त करत असल्याचे प्रमाण वाढले होते. हा प्रकार रोखण्यासाठी सिंधी जागरूक मंचाची स्थापना करण्यात आली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात