Menu Close

तरिकेरे (कर्नाटक) येथे धर्मांधांकडून श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक

गणेशभक्तांनो, हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकीवर होणारी आक्रमणे थांबवण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करा !

तरिकेरे (कर्नाटक) : येथे १८ सप्टेंबरच्या दिवशी सालुमरदम्मा देवस्थानाजवळ विश्‍व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या सार्वजनिक गणेशोत्सवाची मूर्तीविसर्जन मिरवणूक चालू होती. ती कोडी कॅम्पजवळ असलेल्या हॉटेलकडे आल्यावर धर्मांधांनी त्यावर दगडफेक केली. या वेळी परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी सौम्य लाठीमार करून परिस्थिती नियंत्रणात आणली. नंतर मिरवणूक पुढे गेली.

तरिकेरे (कर्नाटक) येथे मुसलमानांमुळे श्री गणेशमूर्ती विसर्जन अन्यत्र करण्याच्या पोलिसांच्या दबावामुळे हिंसाचार

हिंदु महासभेने बसवलेली श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी जात असतांना पोलिसांनी हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना मुसलमानांच्या भागातून जाण्यास मनाई केल्यावर वाद झाला. या वादाला हिंसक वळण लागले. यात पोलीस अधिकार्‍यांसह १८ पोलीस घायाळ झाले. या वेळी पोलिसांनी गणेशभक्तांवर लाठीमारही केला. यानंतर येथे संचारबंदी लावण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी १८ जणांना अटक केली आहे. पूर्वनियोजनानुसार विसर्जन चिक्केरे येथे करायचे होते. तेथे मुसलमानांची घरे आहेत. त्यामुळे ‘तेथे संघर्ष होण्याची शक्यता असल्याने रामनायकनकेरे येथे विसर्जन करावे’, असे पोलिसांनी कार्यकर्त्यांना सांगितले; परंतु कार्यकर्त्यांनी प्रतिवर्षाप्रमाणे चिक्केरे येथेच विसर्जन करणार, असे ठामपणे सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *