भाजपशासित एका राज्याला जमते, ते केंद्र आणि देशातील उर्वरित १९ भाजपशासित राज्यांना का जमत नाही ?, याविषयी भाजपने सांगायला हवे !
डेहराडून : उत्तराखंड राज्याने गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा दिला असून असा दर्जा देणारे ते देशातील पहिलेच राज्य ठरले आहे. याविषयीचे विधेयक उत्तराखंड विधानसभेत एकमताने संमत करण्यात आले. आता हे विधेयक संमतीसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे.
गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा दिल्याने गोहत्या थांबतील ! – पशूपालनमंत्री रेखा आर्य
याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना उत्तराखंडच्या पशूपालनमंत्री रेखा आर्य म्हणाल्या, ‘‘धार्मिक ग्रंथांमध्येही गोमातेचा अनेक ठिकाणी उल्लेख आहे. गोमातेच्या पोटात ३३ कोटी देवता वास करत असल्याचे म्हटले जाते. अशा गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा दिल्याने गायींच्या संरक्षणासाठी योग्य पावले उचलता येतील, तसेच गोहत्याही थांबतील.’’ (‘राष्ट्रमाते’चा दर्जा दिल्यामुळे नव्हे, तर कठोर कायदा करून दोषींवर प्रभावी कारवाई केल्यासच गोहत्या थांबतील, हे लक्षात घेणार का ? – संपादक)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात