पोलिसांना अमानुष मारहाण, पोलिसांची गाडी जाळली !
- धर्मांधांकडून झालेल्या या हिंसाचारांच्या घटनांवर भारतातील प्रसारमाध्यमे मुग गिळून गप्प आहेत; कारण हे त्यांचे पुरो(अधो)गामित्व आहे, असे त्यांना वाटते !
- गोरक्षणाच्या वेळी जमावाकडून होणार्या गोतस्करांच्या मारहाणीवर मात्र हीच प्रसारमाध्यमे बेंबीच्या देठापासून हिंदुविरोधी ओरड मारण्यात आघाडीवर असतात !
गोरखपूर (उत्तरप्रदेश) : २१ सप्टेंबर या दिवशी येथील भटहटमध्ये मोहरमनिमित्त ताजियाची मिरवणूक काढण्यात आली होती. त्या वेळी डिजे लावण्यात आलेल्या गाडीवरील एक जण विद्युततारेच्या संपर्कात आल्याने त्याला विजेचा धक्का बसला. (महाराष्ट्रात न्यायालय गणेशोत्सवाच्या काळात डिजेवर बंदी घालते; मात्र उत्तरप्रदेशात भाजपचे सरकार असतांना मोहरमच्या मिरवणुकीत डिजेच्या वापरावर बंदी का नाही ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) यानंतर मिरवणुकीत सहभागी झालेल्या धर्मांधांनी संतप्त होऊन येथील पोलीस चौकीत घुसून पोलिसांवर आक्रमण केले आणि त्यांना अमानुष मारहाण केली. (धर्मांधांच्या मिरवणुकीच्या वेळी हिंसाचार होतो, हा इतिहास असतांना पोलीस इतके निष्क्रीय रहात असतील, तर त्यांना हीच शिक्षा योग्य असेच जनतेला वाटेल ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) यात एक अधिकारी रक्तबंबाळ झाला, तसेच पोलिसांची गाडीही जाळण्यात आली. एवढ्यावर न थांबता धर्मांधांनी रस्त्यावरील अन्य गाड्यांचीही तोडफोड केली. अशाच प्रकारच्या घटना राज्यातील काही भागांत घडल्या.
१. गोरखपूरच्या तरंग क्रॉसिंगजवळ मिरवणुकीतील वादातून एका युवकावर धर्मांधांकडून तलवारीने आक्रमण करण्यात आले. त्यामुळे जमावाने येथे रस्ताबंद आंदोलन केले. त्यानंतर पोलिसांनी एकाला अटक केली.
२. कुशीनगर येथे ताजियाचा मार्ग पालटण्यावरून झालेल्या वादातून हिंसाचार झाला, त्यात अनेक जण घायाळ झाले.
३. महाराजगंजमध्ये मिरवणुकीच्या मार्गावरून झालेल्या वादामुळे काही ठिकाणी मिरवणूक रोखण्यात आली. त्यामुळे येथे तणाव निर्माण झाला.
४. देवरिया जिल्ह्यातील गौरीबाजारमधील रामपूर चौकामध्ये मिरवणुकीतून तलवार घेऊन जात असतांना ती एका तरुणाला लागली आणि त्याला लगेच उपचार मिळाला नाही; म्हणून धर्मांधांनी संतप्त होत येथे तोडफोड केली. यात पोलिसांच्या गाड्यांसह एका रुग्णवाहिकेची तोडफोड करण्यात आली. (रुग्णवाहिकेचीही तोडफोड करणारे उपचाराची अपेक्षा कशी करतात ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात