Menu Close

अमेरिका : श्री गणेशाचा अवमान करणार्‍या रिपब्लिकन पक्षाची हिंदूंच्या विरोधानंतर क्षमायाचना

परदेशातील हिंदु संघटना देवतांच्या अवमानाचा विरोध करतात, तर भारतातील मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटना निष्क्रीय रहातात !

वॉशिंग्टन : अमेरिकेतील सत्ताधारी रिपब्लिकन पक्षाने भारतीय वंशांच्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी दिलेल्या विज्ञापनातून श्री गणेशाचा अवमान करण्यात आला. त्यामुळे हिंदु संघटनांनी त्याचा विरोध केला. या विरोधामुळे पक्षाने याविषयी क्षमा मागितली आहे. ‘कोणाच्याही भावना दुखावण्यासाठी आम्ही हे विज्ञापन दिले नव्हते’, असे पक्षाने म्हटले आहे.

१. टेक्सासमधील फोर्ट बेंड काऊंटी येथील ‘इंडियन हेराल्ड’ या स्थानिक वृत्तपत्रात हे विज्ञापन देण्यात आले होते. श्री गणेशचतुर्थीनिमित्त देण्यात आलेल्या या विज्ञापनातून रिपब्लिकन पक्षाने डेमॉक्रॅटिक पक्षावर टीका करण्याचा प्रयत्न केला होता; मात्र त्यासाठी गणपतींचा आधार घेण्यात आल्याने हिंदूंनी अप्रसन्नता व्यक्त केली. ‘तुम्ही कोणाची पूजा करणार ? गाढवाची कि हत्तीची?, निवड तुमचीच’, असे यात म्हटले होते. या विज्ञापनामध्ये गणपतीचे चित्र होते. रिपब्लिकन पक्षाचे निवडणूक चिन्ह ‘हत्ती’ असल्याने त्यांनी या विज्ञापनाद्वारे स्वत:ची तुलना गणपतीशी केली होती.

२. हिंदु अमेरिकन फाऊंडेशनचे ऋषी भूतडा यांनी सांगितले की, रिपब्लिकन पक्षाने हिंदु मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करणे कौतुकास्पद आहे; मात्र यासाठी हिंदूंच्या देवतांचा आधार घेऊन त्यांचा अपमान करणे निषेधार्ह आहे.

३. राजकीय पक्षांनी स्वत:चे विज्ञापन करण्यासाठी देवतांचा आधार घेणे चुकीचे आहे, रिपब्लिकन पक्षाने हे विज्ञापन मागे घ्यावे, अशी मागणी सामाजिक माध्यमांवरून करण्यात आली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *