हिंदु राष्ट्र संपर्क अभियानाच्या अंतर्गत हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि गुजरात राज्याचे समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी सोलापूर येथील घेतलेल्या हिंदुत्वनिष्ठ आणि उद्योजक यांच्या भेटी !
१. दैनिक सनातन प्रभातचे वर्गणीदार बांधकाम व्यवसायिक श्री. विकास सावंत यांनी सनातनच्या ग्रंथ संचाची मागणी केली, तसेच ‘माझ्या कुटुंबियांनाही साधनेविषयी माहिती द्या’, तसेच ‘हिंदु धर्म आणि संस्कृती यांचे माझ्या मुलावर संस्कार करणार’, असे त्यांनी सांगितले अन् यापुढे अर्पणाच्या माध्यमातून सहभागी होईन, असेही ते म्हणाले.
२. बांधकाम व्यवसायिक श्री. शैलेश एकबोटे यांचे बांधकामाचे काम फोंडा गोवा येथे चालू आहे, त्यामुळे ते आणि त्यांचे भागीदार श्री. महांकाळ सनातनच्या रामनाथी आश्रमाला भेट देणार आहेत.
३. दैनिक सनातन प्रभातचे वर्गणीदार आणि सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष अधिवक्ता संतोष न्हावकर यांनी सनातन संस्थेला पाठिंबा देण्यासाठी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांना पत्र लिहिणार आहे, असे सांगितले, तसेच सोलापूर येथे ३० सप्टेंबर या दिवशी अधिवक्ता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे, त्यामध्ये अधिकाधिक अधिवक्त्यांना सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करणार, असे सांगितले.
४. दैनिक सनातन प्रभातचे वर्गणीदार आणि सनदी लेखापाल श्री. श्रीनिवास वैद्य यांनी यापुढील कोणत्याही उपक्रमात आवश्यक ते साहाय्य करीन, असे सांगितले.
५. दैनिक सुराज्यचे संपादक श्री. राकेश टोळ्ये यांनी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने बनवण्यात आलेले राष्ट्र आणि धर्म विषयक लेख आणि बातम्या यांच्या प्रसिद्धीसाठी साहाय्य करतो, असे सांगितले.
६. शिक्षण प्रसारक मंडळी पुणेचे सदस्य आणि सोलापूर शाळा समिती अध्यक्ष, तसेच सनदी लेखापाल श्री. राजेश पटवर्धन यांनी सनातनचे काही ग्रंथ आणि ध्वनीचित्र तबकडी यांची मागणी केली, तसेच ते अध्यक्ष असलेल्या शाळेमध्ये ग्रंथ वितरणासाठी साहाय्य करणार, असे सांगितले. श्री. पटवर्धन यांचे सोलापूर येथील मध्यवर्ती ठिकाणी सभागृह आहे तेथे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यक्रम घेण्यास अनुमती दिली. सनातन संस्थेच्या वतीने प्रति रविवारी घेण्यात येणार्या भावसत्संगात सहभागी होणार, असे सांगितले.
७. दैनिक सनातन प्रभातचे वर्गणीदार आणि टॉवेल कारखानदार श्री. किशोर पुकाळे हे संस्था स्तरावर खरेदी केले जाणारे टॉवेल आणि चादर यांसाठी साहाय्य करतात.
८. विवेक विचार, विवेकानंद केंद्र कन्याकुमारी मासिकाचे संपादक श्री. सिद्धाराम पाटील हे दैनिक सनातन प्रभातचे वर्गणीदार आहेत. त्यांनी ‘सनातन सत्यदर्शन’ हा अंक मला द्या त्यावरून हाताळण्यास सोपी होईल अशी छोटी पुस्तिका सिद्ध करून घेतो, म्हणजे लोकांना ती वाचता येईल, असे त्यांनी सांगितले.
९. घाऊक कपडे व्यापारी आणि अर्पणदाते अन् विज्ञापनदाते श्री. श्याम वाधवानी यांना श्री. मनोज खाडये यांनी समष्टी साधनेविषयी माहिती सांगितली.
१०. आधुनिक व्यायामशाळेचे श्री. आनंद गोसकी यांनी ‘यापुढे अनेक प्रकारे संघटनेच्या कार्यात सहभागी होईन’, तसेच त्यांच्या व्यायामशाळेत येणार्या हिंदुत्वनिष्ठ मुलांची बैठक ठरवणार, असे त्यांनी सांगितले.