तथाकथित विचारवंतांच्या हत्यांच्या प्रकरणी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची सनातन संस्थेला ‘क्लिन चीट’
पणजी : तथाकथित विचारवंतांच्या हत्यांच्या प्रकरणी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने सनातन संस्थेला ‘क्लिन चीट’ दिली आहे. या अनुषंगाने मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया दिली आहे.
ढवळीकर म्हणाले, ‘‘विचारवंतांच्या हत्येचा मी निषेध करतो; मात्र सनातन संस्था विचारवंतांच्या हत्येत सहभागी नाही. उजव्या विचारसरणीच्या संस्थांविषयी अपप्रचार करण्यासाठी काही लोक सक्रीय आहेत. सनातन संस्था चांगले कार्य करत आहे. सनातन अध्यात्माचा प्रसार करते आणि ही शिकवण सध्या राष्ट्र अन् संपूर्ण जग यांच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. सनातन संस्था विचारवंत, लेखक आदींच्या हत्यांमध्ये सहभागी नाही. मी संस्थेला ‘क्लिन चीट’ देतो. विचारवंत, लेखक आदींच्या हत्या होऊ नयेत; मात्र एखाद्या कुटुंबातील व्यक्ती काही वाईट कृत्य करत असेल, तर सर्व कुटुंबाला ‘वाईट’ असे ‘लेबल’ लावणे चुकीचे आहे. सनातनविषयी बोलण्यापूर्वी असे बोलणार्यांनी सनातनच्या आश्रमाला भेट देऊन त्यांचे कार्य जाणून घेऊन मगच बोलावे. हत्यांच्या प्रकरणी अटक केलेल्यांविषयी न्यायालयाने निवाडा दिल्यानंतर संस्थेवर होत असलेल्या आरोपांविषयी प्रतिक्रिया देऊ शकेन.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात