अमरावती येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उभारलेला प्रबोधनकक्ष पोलिसांनी हालवायला लावला आणि लांब अंतरावर जाऊन बसण्यास सांगितले. प्रत्यक्षात भाविकांनी मात्र या प्रबोधन कक्षाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अभिप्राय पुढीलप्रमाणे –
१. मनोभावे पूजा केलेली श्री गणेशमूर्ती पाण्यात फेकून देतात, हे पाहून फार वाईट वाटले. अशा व्यवस्थेमुळे आमच्या भावना दुखावल्या गेल्या.
२. हिंदु जनजागृती समितीमुळे आम्हाला या विसर्जन व्यवस्थेतील सत्य समजले. यापुढे आम्ही याठिकाणी विसर्जन करण्यास येणार नाही.
३. हिंदुत्वाचे म्हणवणारे सरकार सत्तेत असूनदेखील हिंदूंच्या श्रद्धास्थानाची अशाप्रकारे विटंबना केली जात आहे. यासाठीच आम्ही हिंदूंच्या सरकारला निवडून दिले का ? तुम्ही करत असलेेले प्रबोधन कौतुकास्पद आणि आवश्यक आहे.
४. शासनानेच मोठ्या आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी घातल्यास लोक त्या घेणारच नाहीत आणि बाप्पाची विटंबना होणार नाही.
५. एका समाजसेवी संस्थेेचे पदाधिकारी श्री. गांधी यांनी सांगितले की, आम्ही हिंदु जनजागृती समितीसमवेत कार्य करण्यास सिद्ध आहोत. समिती करत असलेल्या कार्याविषयी मला आवड आहे. तुमची प्रबोधन करण्याची दिशा आवडली. वर्षभर होणार्या प्रदुषणाविषयी, सांडपाण्याविषयी काही लिखाण किंवा पुरावे असतील, तर त्याआधारे समितीसमवेत पुढे शासकीय स्तरावर कार्य करण्यास मी उत्सुक आहे.
६. सर्वच भाविक प्रबोधन कक्षावरील फलक उत्साहाने वाचून त्याची छायाचित्रे काढत होते.